गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कुटुंबीयांसह गोंदिया येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. प्रफुल्ल पटेल हे काल बारामती मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होते. दरम्यान, रात्री उशिरा ते गोंदियात परतले. आज सकाळीच त्यांनी पत्नी वर्षा पटेल, मुली पुर्णा, व मुलगा प्रजय यांच्यासह स्थानिक एनएमडी कॉलेज येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रफुल्ल पटेल यांना मतदान केंद्रातील अव्यस्थेची व पोलीस कर्मचारी मतदारांसोबत करीत असलेल्या अरेरावीची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली. हे ऐकून पटेल यांनी त्वरित उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.

हेही वाचा…आधी मतदान मग लग्न… बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क; चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ११ वाजतापर्यंत…

मतदान केंद्रावर मतदार पावतीचे वितरण न करण्यात आल्यामुळे बहुतांश मतदारांना मतदानाचा हक्क न बजावताच परतावे लागले. याबाबतची तक्रार आपण जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.