वर्धा : वर्धा मतदारसंघातून कोण लढणार, हा आता काळीच मुद्दा ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस नेते यांच्यात या जागेवरून घमासान सुरू आहे. गेल्यावेळी विदर्भातून भंडारा व अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला होता. आता या पक्षाने हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेससाठी सोडले. या मोबदल्यात काँग्रेसने वर्धा मतदारसंघ शरद पवार गटास दिला. मात्र, ही तडजोड मान्य न झालेल्या स्थानिक नेत्याने वर्धा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “वंचितचा खासदार सतीशदादा पवार!”, युवा जिल्हाध्यक्षांच्या ‘पोस्ट’ने चर्चांना उधाण; म्हणाले, “वरून मेसेज आल्यामुळे…”

असे म्हटल्या जाते की, तडजोड करताना या स्थानिक नेत्यांना वरिष्ठांनी काडीची किंमत दिली नाही. लढण्यास सक्षम उमेदवारच नाही, असे स्पष्ट करीत वर्धेचे काँग्रेस महात्म्य नाकारले. ही बाब अमान्य करीत अमर काळे, चारूलता टोकस, नरेश ठाकरे, शेखर शेंडे, शैलेश अग्रवाल या नेत्यांनी उमेदवार आहे; तुम्ही वर्धा सोडू नका, असा हट्ट धरला. आता ही निकराची लढाई ठरत आहे. कारण, वर्धा काँग्रेसला दिल्यास पवार गटास दुसरी कोणती जागा देणार, असा पेच आहे. विदर्भात एक जागा हवीच, अशी शरद पवार गटाची भूमिका आहे. काँग्रेसने विदर्भात शक्य नसेल तर पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा पवार गटास द्यावी व वर्धेची जागा घ्यावी, असा पवित्रा आता स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.

हेही वाचा >>> सुधीर मुनगंटीवारांचा प्रचार सुरू; काँग्रेस नेते उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीत अन् तेली समाजाच्या उमेदवाराची एन्ट्री!

टोकस व काळे हे याच वाटाघातीत लागले आहे. आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे, असे टोकस म्हणाल्या. आणखी दोन दिवस लागू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. या लढाईत पूर्वीपासूनच सक्रिय असलेले शेखर शेंडे व अग्रवाल हे हताश होत वर्धेत थांबले आहे. काँग्रेसकडून वर्धेसाठी प्रयत्न करणारे थकत चालले आहे, तर पवार गटाकडून लढण्यास इच्छुक वाढत चालले असल्याचे चित्र आहे. वर्धा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. म्हणून याविषयी थोडा वेळ घेतला जाऊ शकतो. पण पवार गटाने कोण पैसे लावू शकतो, असे स्पष्ट करीत एकप्रकारे टेंडरच काढल्याचे गंमतीने बोलल्या जात आहे. ते ही जागा काँग्रेससाठी मुळीच सोडणार नाही, असा कयास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar and congress conflict over wardha constituency claim pmd 64 zws