अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) वाढीसाठी सदस्य जोडो अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी विविध पातळीवर लढा देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे महानगराध्यक्ष रफिक सिद्दिकी यांनी दिली.

हेही वाचा >>> नागपूर: “केवळ तार्किक मुद्दयांच्या आधारावर आरोपीचे स्वातंत्र्य हिरावले जाऊ शकत नाही” न्यायालयाने टोचले सरकारचे कान

Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Sanjay Raut claims to contest Mumbai Municipal Corporation elections on his own Mumbai news
मुंबई महापालिका स्वबळावर, अन्य ठिकाणी मविआ; संजय राऊत यांचा दावा

अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्यावतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, देवानंद टाले, पंकज गावंडे आदी उपस्थित होते. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा जनाधार आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. आगामी काळात संघठन अधिक मजबूत करून महापालिका निवडणूक पक्षाच्यावतीने सक्षमपणे लढण्यात येतील. वरिष्ठांच्या आदेशाने महाविकास आघाडीमध्येच घटकपक्षांसोबत आघाडी करून निवडणूक लढण्याचे नियोजन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी अनेक नेते, माजी नगरसेवक येण्यासाठी उत्सुक आहेत. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होईल, असे रफिक सिद्दिकी म्हणाले.

अकोला महापालिकेत गत अनेक वर्षांपासून भाजप सत्तेत आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांनी शहरात मूलभूत सुविधा देखील पुरवल्या नसून समस्यांचा भडिमार आहे. एकीकडे भरमसाठ मालमत्ता करवाढ करण्यात येत आहे, दुसरीकडे नागरिकांना अडचणी, समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ते खड्डेमय झाले असून नाल्या तुंबल्या आहेत. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादीच्यावतीने आगामी काळात लढा देण्यात येईल, असे रफिक सिद्दिकी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> वनखात्यात वनरक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात, सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा…

सत्तेसाठी ‘त्यांनी’ विचारसरणी सोडली – संग्राम गावंडे ईडी सारख्या यंत्रणेकडून संभाव्य कारवाईची भीती व सत्तेच्या लालसेपोटी शाहू, फुले, आंबेडकरांची विचारसरणी सोडून ते सत्ताधाऱ्यांकडे गेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर केली. मतदारांशी सहानुभूती शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाला चांगले यश मिळणार असून गेलेले नेते देखील परत येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader