वर्धा : सहकार नेते व माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी वर्धेत करण्यात आले आहे. वीस मे ते पुढील वीस मे असा वर्षभर हा कृतज्ञता सोहळा विविध उपक्रमांनी साजरा होत असल्याचे सत्कार समितीने नमूद केले. उद्या होणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी,माजी मंत्री अनिल देशमुख,माजी आमदार उल्हास पवार, खासदार रामदास तडस उपस्थित राहणार आहे.सत्कार समिती प्रमुख दत्ता मेघे असून त्यात माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख,राजेंद्र शिंगणे, गिरीश गांधी,सुभाष धोटे,डॉ.संतोष कोरपे,अरविंद पोरेड्डीवार, राजेंद्र जैन व प्रवीण देशमुख यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोहळ्यास अधिकाधिक गर्दी व्हावी म्हणून सर्व ती तयारी करण्यात येत आहे.जिल्ह्यात राष्ट्रवादी  काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणून प्रा.देशमुख यांची ओळख दिल्या जाते.समंजस व सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचे धनी समजल्या जाणाऱ्या देशमुख यांचे पवार कुटुंबाशी सौख्य लपून नाही.मात्र राजकीय पटांगणात त्यांचा गत चाचपडत असल्याचे चित्र आहे.तसेच अन्य नेत्यांची एंट्री जिल्हा राजकारणात झाल्याने हा सहकार गट स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याच्या तयारीत आहे.शनिवारी होणाऱ्या सोहळ्यात त्याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp show of strength suresh deshmukh organizing a felicitation ceremony pmd 64 ysh