नागपूर : जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्यानेच निराशेतून भाजपा नेते शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांनी एका पत्रकाद्वारे केला.

हेही वाचा – अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून चित्रफीत समाज माध्यमावर सार्वत्रिक

हेही वाचा – “महावितरणचा वीज बिल भरणा तत्काळ करा”, न्यायालयाचे गोंदिया जि.प. ला निर्देश, २४ ऑगस्टपासून पुरवठा बंद

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना आर्य यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली. शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे खोटे बोलत नाहीत. मोदींनी २०१४ मध्ये महागाई कमी करण्याचे, तरुणांना रोजगार देण्याचे, काळे धन परत आणण्याचे आश्वासन दिले होते. लोकांच्या खात्यात १५ लाख जमा होणार होते याचे काय झाले, असा प्रश्न आर्य यांनी केला.

Story img Loader