नागपूर: राज्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नागपुरात वाढदिवसाला मित्रत्वाच्या शुभेच्छा देत ही दोस्ती तुटायची नाय असे फलक लावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही दोस्ती तुटायची नाय असे फलक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने लावले आहे.

हेही वाचा… राज्यात तीन महिन्यात ‘आरपीएफ’कडून ४०८ मुलांचा शोध; भुसावळ विभागातील ११९ मुलांचा समावेश

राजकारणातील दादा अजित दादा व राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा मजकूर शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसने लावले. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले शुभेच्छा देणारे फलक लक्ष वेधून घेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp workers put hoarding in nagpur for wishing devendra fadnavis ajit pawar birthday vmb 67 dvr