* खासगी रुग्णालयांतही माफक दरात उपचार मिळावे
* महापालिकेने मानसिकता बदलण्याची आवश्यकता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शहराचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पडसे, खोकल्यासह तापाचेही रुग्ण मेडिकल, मेयोसह डागा रुग्णालयात उपचार घेतात. श्रीमंत रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असले तरी बरेच मध्यमवर्गीय उपचाराच्या जास्त खर्चामुळे पुरते कंगाल होतात. या सगळ्यांना अद्यावत उपचाराकरिता शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ५० हेल्थपोस्ट व ४ सुपरस्पेशालिटी दर्जाच्या शासकीय रुग्णालयांची गरज आहे, परंतु त्याकरिता महापालिकेने जुनी मानसिकता बदलून स्मार्ट होण्याची गरज आहे.
येथील अनेक खासगी रुग्णालयात अद्यावत आरोग्यसेवा उपलब्ध असली तरी त्यांचे दर फार जास्त आहेत. राज्यात केवळ नागपूरलाच मेडिकल व मेयो हे दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये असून शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालये या महत्त्वाच्या वैद्यकीय संस्थाही गरिबांसह मध्यमवर्गीयांना अद्यावत सेवा देत आहेत. शहरात इतरही अनेक वैद्यकीय संस्था असून लवकरच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) सुरू होणार आहे. शहरातील वैद्यकीय क्षेत्राचा विकास चांगला असला तरी सर्व स्तरातील रुग्णांना परवडेल, अशा दर्जेदार वैद्यकीय सेवा मात्र शहरात सध्या नाहीत.
स्मार्ट सिटीमध्ये नागपूरकरांना मोफत वा माफक दरात आरोग्यसेवा मिळायला हवी. शहराची कागदावरील लोकसंख्या साडे पंचवीस लाखांच्या घरात असली तरी प्रत्यक्षात ता ४० लाखावर आहे. त्या मानाने शहरात सध्या ५० हेल्थपोस्ट व गंभीर रुग्णांकरिता चार अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी रुग्णालयांची गरज आहे. भविष्यात लोकसंख्या वाढल्यास त्यात आणखी वाढ होण्याची गरज आहे. या रुग्णालयात व्हेंटिीलेटरपासून सगळ्याच विभागातील पदव्युत्तर तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असून सगळ्याच आजारावर उपचार व्हायला हवे. त्याकरिता महापालिकेने स्वत एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांसह बरेच मनुष्यबळही मोठय़ा प्रमाणात आसावे लागेल. याकरिता निश्चितच मोठा खर्च येणार असून महापालिकेला पुढील पाऊल उचलावे लागणार आहे. तशी इच्छाशक्तीही महापालिकेने दाखवण्याची गरज आहे.
महापालिकेकडून नागरिकांना कमी खर्चात मूलभूत आरोग्य सुविधा मिळण्याची अपेक्षा असते, परंतु शहरात महापालिकेचे इंदिरानगरातील आयसोलेशन रुग्णालय, पाचपावलीचे महिला व बाल रुग्णालय, गांधीनगरातील इंदिरा गांधी रुग्णालयातील खाटांची एकूण संख्या १३१ आहे. पन्नास वर्षांत लोकसंख्येच्या तुलनेत एकही खाट शहरात वाढलेली नाही.
दरवर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात आरोग्य विभागाच्या खर्चात मात्र वाढ होत आहे. सामान्यांकडून महापालिका आरोग्य कर वसूल करीत असली तरी त्यांच्या एकाही रुग्णालयात पदव्युत्तर औषधशास्त्र, सर्जरी, बालरोग असो की, बधिरीकरण तज्ज्ञ मात्र दिसत नाही. केवळ डिग दवाखान्याच्या धर्तीवर बाह्य़रुग्ण विभागात पाच-पंचवीस रुग्णांची तपासणी केली जाते.
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणारे नागपूर कॅन्सरग्रस्तांची राजधानी बनत असून त्यांच्यावर उपचाराकरिताही शहरात अद्यावत सुविधा उपलब्ध होण्याची गरज आहे.
‘शासकीय रुग्णालयात
लोकप्रतिनिधींनीही उपचार घ्यावे’
कर्करोगावरील उपचार महागडे आहेत. मेडिकलमध्ये ५ हजारात रेडिओथेरपी होते. धर्मादाय रुग्णालय असलेल्या राष्ट्रसंत तुडकोजी महाराज कर्करुग्ण रुग्णालयात ५० हजारात, तर खासगीत याकरिता लाखावर खर्च येतो. मध्यमवर्गीय कुटुंब कर्करोगावर उपचार करताना बीपीएलही होताना दिसतात. नागपूर ही कर्कग्रस्तांची राजधानी बनत आहे, परंतु शासन याकडे गंभीरतेने बघत नाही. शहरात मेडिकल वगळता एकही शासकीय कर्क रुग्णालय नाही. दुपारी दोननंतर मेडिकलमध्ये कॅन्सरवरचे उपचार थांबतात. यामुळे शासकीय रुग्णालयांची प्रतिष्ठा आणि उपचाराचा दर्जा वाढवायचा असेल तर शासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनीही शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी यावे. त्यानंतरच या रुग्णालयांची स्थिती सुधारण्यास मदत होईल. निश्चितच त्याने स्मार्ट सिटीला शोभेल, अशी आरोग्यसेवा नागरिकांना मिळेल, असे मत नागपूरचे ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. क्रिष्णा कांबळे यांनी व्यक्त केले.
खासगी डॉक्टरही रुग्णांना सवलत देतात
शहरात मेयो आणि मेडिकल, अशी दोन वैद्यकीय महाविद्यालये आहेत, परंतु त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. गावखेडय़ासह नागपुरातील गोरगरीब येथे उपचारासाठी येतात. त्यांना सेवा मिळते, परंतु स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपुरात तेथील सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. खासगी वैद्यकीय सेवा महागडी आहे. त्यामागची कारणे विचारात घेणे आवश्यक आहे. सेवाभावी व्यवसाय असूनही या व्यवसायावर महापालिकेकडून व्यावसायिक दरानुसार कर वसूल केला जातो. यामुळे खाजगी डॉक्टरांवर भरुदड बसतो. पर्यायाने याचा फटका रुग्णांना बसतो. यामुळे खासगी वैद्यकीय सेवा महागडी, असा थेट आरोप करणे योग्य नाही. गरिबांना काही प्रमाणात प्रत्येक खाजगी डॉक्टर सवलत देतात, हेही तेवढेच सत्य असल्याचे मत आयएमएचे नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अजय काटे यांनी व्यक्त केले.
शहरातील रुग्णालयातील उपलब्ध खाटा
शहरातील रुग्णालये खाटा
पालिकेची तीन रुग्णालये १३१
मेडिकल १७०१
मेयो ५९२
सुपर स्पेशालिटी १८०
डागा ३५०
६५० खासगी रुग्णालये ८,२००
एकूण ११,१५४