लोकसत्ता टीम

नागपूर : विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड होताच, परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाने काही क्षण सभागृह अवाक् झाले.

विधान परिषद सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदे यांनी बुधवारी अर्ज दाखल केला होता. तर राम शिंदे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार राम शिंदे यांच्या निवडीची घोषणा आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात केली. त्यानंतर राम शिंदे हे त्यांच्या आसनाकडे जात असताना निलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानामुळे विधानपरिषदेमध्ये हास्यकल्लोळ उडाला. त्या म्हणाल्या, “तुम्हाला आता मागच्या दाराने जावे लागेल.”

आणखी वाचा-कर्नाटकातील सरकारवर बेळगाववरून हल्लाबोल, शंभूराज देसाई म्हणाले…

विधान परिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शंकर शिंदे यांची गुरुवारी आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी राम शिंदे यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्यबद्दल विरोधी पक्षाचा सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. मात्र, उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले. राम शिंदे यांनी सभापती म्हणून पदभार स्वीकारताना शिंदे यांची आई तसेच संपूर्ण कुटुंब सभागृहातील गॅलरीत उपस्थित होते. गोंधळात सभागृहाचा बहुमूल्य वेळ वाया जाणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण लोकशाही हितासाठी उपयोगी ठरेल अससे वर्तन आपण ठेवूया असे सांगत नवनिर्वाचित सभापती राम शिंदे यांनी सदस्यांना सांगितले.

आणखी वाचा-लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा…

सभापतीपदी निवड झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी राम शिंदेंचं अभिनंदन केले त्यानंतर सभापतींनी त्यांच्या आभार भाषणात सर्वांना मौल्यवान सल्ला दिला. सभापती राम शिंदे म्हणाले की, प्रश्नोत्तराच्या तासाचे विशेष महत्त्व आहे. अधिवेशनाचा काम झाल्यानंतर खूप मोठी यंत्रणा यामागे काम करत असते. समित्यांचे गठन आणि त्यांचे कामकाज गतीमान करण्याला प्राधान्य देण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदिसह नऊ सदस्यांनी अभिनंदनपर भाषण केले.

Story img Loader