लोकसत्ता टीम

नागपूर : नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली मानसोपचार तज्ज्ञाकडून महिलांवर अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात महत्वाची माहिती पुढे येत आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात पोलिसांसह इतरही विभागांना महत्वाची सूचना केली आहे.

Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
Unnatural sexual assault with female lawyer by husband family and in laws
महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार… न्यायाधीश असलेला सासराही…
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती

हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशकाने मागील नऊ- दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी- बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आली असून त्यावेळी अज्ञान असलेल्या मुलींच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार व ब्लॅकमेलिंग केल्याचे समजते.

आणखी वाचा-जिल्हा परिषद ते महापालिका : प्रशासकीय राजवटीचे वर्तुळ पूर्ण

सदर प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर शहर पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. पोलिसांनी या एका तक्रारीच्या आधारे अजून तीन फिर्यादींचा शोध घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. स्वयंप्रेरणेने केलेली ही कार्यवाही दखलपात्र व मानवी अधिकाराबाबत सजगता दाखवून देणारी आहे, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

निर्देश काय?

संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी. मागील नऊ-दहा वर्षापासून आरोपीकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याने याबाबत सबळ पुरावे संकलित करण्यात यावेत व चार्जशीट दाखल करण्याची दक्षता घ्यावी. साक्षीदार सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधित पीडित महिला साक्षीदार यांना योग्य संरक्षण पुरवण्याची कार्यवाही करावी. त्यांच्या नावांबाबत गोपनीयता राखण्यात यावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयासमोर चालवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्याचबरोबर आरोपीस कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने अनुभवी व निष्णात सरकारी वकील नियुक्त करण्यात यावेत.

आणखी वाचा-वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड

महिला समुपदेशक नियुक्त करून त्यांच्यामार्फतच संबंधित महिलांना योग्य समुपदेशन करावे यासाठीची तरतूद करावी. तसेच नियमितपणे समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तींकडून निरपेक्ष व स्वतंत्र यंत्रणांकडून समुपदेशन प्रक्रियांचे मूल्यमापन करण्यात यावे. मुलींचे स्वमदत गट तयचार करून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम विश्वासार्ह महिला संस्थांतर्फे करून घेण्यात यावे. त्याचबरोबर या प्रकरणी शासकीय पंचांची नियुक्ती करून तपासामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

Story img Loader