वर्धा : नॅशनल इलीजीबीलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात नीट यूजी परीक्षेस अवघे काही तास शिल्लक उरले आहे. असे असतांना नॅशनल टेस्टिंग एजेंसीने काही सूचना प्रसारित केल्या आहेत. हॉल तिकिटावर उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी, रोल नंबर, बारकोड आदी माहिती ठळकपणे असावी. तशी ठळक दिसत नसेल तर उमेदवारास परीक्षा खोलीत प्रवेश मिळणार नाही. टेस्टिंग एजेंसी म्हणजेच एनटीए तर्फे तसे सूचित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राबाबत काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत. डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रवार फोटो, स्वाक्षरी, रोल नंबर, बारकोड ठळकपणे दिसावे. हे तपशील चाचणी दरम्यान कागदपत्रांची ओळख व पडताळणी साठी आवश्यक आहे. ठळक दिसत नसल्यास परीक्षा खोलीत प्रवेश मिळणार नाही.

हेही वाचा…नागपूर जिल्ह्यात सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के, कारण काय?

प्रवेशपत्रात काही आवश्यक बाबी दिसत नसल्यास एनटीएच्या वेबसाईट वरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे. किंवा उमेदवार ०११- ४०७५९००० ईथे संपर्क करू शकतात. नवीन हॉल तिकीट साठी नीट एनटीए वर ई मेल करू शकतात. केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी कसून तपासणी होणार आहे. मोबाईल, इअर फोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड, पाकीट, सनग्लासेस, हँडबॅग, बेल्ट, टोपी, घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा आदी वस्तू निषिद्ध आहेत. खाद्यपदार्थ, पाण्याची बॉटल यास मनाई आहे. न्यायालयाच्या सर्व आदेशाचे तंतोतंत पालन केल्या जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet ug exam national testing agency issues crucial instructions for admit card requirements and exam center entry pmd 64 psg