नागपूर : स्त्रिया जशा वृद्ध होत जातात, तसे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढत आहे, असे निरीक्षण हेल्पेज इंडियाने नोंदवले आहे. १५ जून रोजी जागतिक ज्येष्ठांवर होणारे अत्याचार जागरूकता दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

देशात एकूण स्त्रियांच्या लोकसंख्येत ६० पेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांचे प्रमाण २०२१ मध्ये ११ टक्के होते. देशात ६६ कोटी महिलांची लोकसंख्या असून सुमारे ७ कोटी वृद्ध महिला आहेत. या अहवालानुसार वृद्ध स्त्रियांना असमानतेला समोर जावे लागते. यात प्रखर वास्तवही मांडण्यात आले आहे. अहवालानुसार ५४ टक्के स्त्रिया निरक्षर आहेत, ४३ टक्के विधवा आहेत, १६ टक्के जणींचा छळ होतो, ७५ टक्के जणींकडे कसलीही बचत नाही, तर ६६ टक्के वृद्ध स्त्रियांकडे कसलीच मालमत्ता नाही. त्या आर्थिक पातळीवर असुरक्षित आहेत.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

हेही वाचा – पश्चिम विदर्भातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच

बहुतेक महिलांना आपले कुटुंब किंवा समाजात पारंपरिक भूमिका पार पाडावी लागते. त्यांना कायम गृहीत धरले जाते. त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात नाही. काही ठिकाणी सरकारी जनहित योजना, पेन्शन, आरोग्यसेवा व आर्थिक सहभाग उपक्रमांमध्ये प्राधान्य, स्त्रियांसाठी खास योजना आणि वृद्धांच्या छळासाठी तक्रार निवारण यंत्रणा अशा गोष्टी राबवल्या जात आहेत, असेही हेल्पेज इंडियाच्या निरीक्षणात आढळले आहे.

हेही वाचा – आमदार बच्‍चू कडू म्‍हणतात, “बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल…”

काय काळजी घ्यावी?

वृद्धांचा त्रास टाळण्यासाठी वृद्ध स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याविषयी जागरूकता निर्माण करणे, शैक्षणिक व्यासपीठांच्या माध्यमातून संवेदनशील, आदरपूर्ण संस्कृती जोपासण्यास चालना देणे, वृद्ध स्त्रियांसाठी डिजिटल प्रशिक्षण कार्यशाळा घेणे, वृद्धांच्या छळाविषयी आणि तक्रार निवारण यंत्रणेविषयी घरोघरी जाऊन तसेच रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल पटलावर जागरूकता निर्माण करण्याचीही गरज असल्याचे हेल्पेज इंडियाचे म्हणणे आहे.