नागपूर : शहरातील झाडांवर आधीच विकासाच्या नावावर कुऱ्हाड चालवली जात आहे. त्यात पुन्हा सिमेंट रस्ते तयार करताना सिमेंट थेट झाडांच्या बुंध्यापर्यंत नेले जात आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण तो शाश्वत असायला हवा. त्यासाठी झाडांचा बळी घेण्याची गरज काय, असा प्रश्न स्वयंसेवींनी उपस्थित केला.

नागपुरात गेल्या एक महिन्यापासून झाडांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याची मोहीम सुरू आहे. यात अनेक स्वयंसेवी सहभागी झाले आहेत. त्यातील योगिता खान, निशांत डहाके, रोहन अरसपुरे, अभिषेक उरकुडे, अपूर्वा बावनकडे यांनी ‘लोकसत्ता’ला सदिच्छा भेट दिली व विकासाच्या धडाक्यात झाडांचा कसा श्वास कोंडतोय, याची व्यथा सांगितली.

hawala money looted by armed gang
कराडजवळ हवाला पद्धतीतील पाच कोटी सशस्त्र टोळीने लुटले; चार संशयीत पोलिसांच्या ताब्यात
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
tigress choti tara seen with her two cubs in Tadoba Andhari tiger project
भांडण की दंगामस्ती! ताडोबातील ‘छोटी तारा’ पाठोपाठ आता तिचे बछडेही…
due to leopard attcak villegers in terror in chandrapur
बिबट्याच्या “त्या” सवयीने गावकरी दहशतीत
thane building
डोंबिवलीत कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या बांधकामधारकांना साहाय्यक आयुक्तांची नोटीस
Chhota Dadiyal tiger, Moharli, Tadoba-Andhari tiger,
Video : माझं जंगल, माझं राज्य… ‘या’ वाघाने थेट रस्त्यालगतच मांडले ठाण; मग दाढी कुरवळत…
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात

हेही वाचा – नागपूर : नवतपात वीज यंत्रणेला आग, वीज खंडित; आगीच्या घटना वाढल्या

रस्ते सिमेंटचे करा किंवा डांबरचे. परंतु, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना सावली देणाऱ्या झाडांचाही विचार करा. भूजल पातळी आधीच खालावली आहे. सिमेंटीकरण आणि डांबरीकरणामुळे झाडांची मुळे कापली गेली आहेत. जी उरली आहेत त्यांना पाणी मिळत नाही. तरीही प्रशासन ढिम्म आहे. म्हणूनच आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. एका रविवारी नियोजन केले जाते आणि दुसऱ्या रविवारी प्रत्यक्ष मोहीम राबवली जाते. यासाठी आम्ही स्वत:च्या खिशातून खर्च करतो. झाडांच्या बुंध्याशी असलेला सिमेंट-काँक्रिटचा, डांबरीकरणाचा मलबा बाहेर काढल्यानंतर तो उचलण्याकरिता मात्र महापालिकेला सांगावे लागते.

बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी झाडांच्या बुंध्यांना लागून सिमेंटीकरण केले आहे. बऱ्याच ठिकाणी फावड्याने कामे करता येत नाहीत. त्यासाठी योग्य तंत्रज्ञानही आवश्यक आहे. आम्ही जमेल त्या पद्धतीने झाडांचा श्वास मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत राहू, असे या स्वयंसेवींनी सांगितले.

नागरिकांकडून मदतीचा हात

झाडांचाही जीव गुदमरतो हे प्रशासनाला कळत नाही. मात्र नागरिकांना आता ते कळायला लागले आहे. आम्ही राबवत असलेल्या मोहिमेला काही ठिकाणी सहकार्यदेखील मिळत आहे. नागरिक स्वत:हून आता श्वास कोंडलेल्या झाडांचे छायाचित्र पाठवायला लागले आहेत. – योगिता खान.

बांधकाम कंत्राटदार अल्पज्ञानी

आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करतो, पण ते करताना त्यांच्याकडील विज्ञानाचे अनुकरण करत नाही. रस्ते बांधताना झाडांना आळे करावे लागतात, त्यांना मोकळा श्वास हवा असतो, हे या बांधकाम कंत्राटदारांना माहिती तरी आहे का? – रोहन अरसपुरे.

हेही वाचा – शिवस्वराज्यदिनी सुवर्णकलशासह गुढी कशी उभारणार? सुवर्ण कलश आणायचा कुठून?

महापालिकेकडून प्रतिसाद नाही

शहराची भूजल पातळी अतिशय खालावली आहे. रस्त्यांचे सिमेंटीकरण, डांबरीकरण करून झाडाला पाणी मिळण्याचे इतर स्रोतही बंद केले जात आहेत. महापालिकेच्या लक्षात ही बाब आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, साधी दखलही घेतली जात नाही. – अपूर्वा बावनकडे.

जुन्या झाडांचे संरक्षण आवश्यक

शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे झाडे वाचवावीच लागतील. नवीन झाडे लावली जातील. पण, ती वाढायला उशीर होणारच आहे. अशावेळी शहराचे पर्यावरण टिकवून ठेवायचे असेल तर जुन्या झाडांचे संरक्षण व संवर्धन आवश्यक आहे. – अभिषेक उरकुडे.

प्रत्येक झोनमधून लोकांनी समोर यावे

शहरात अनेक ठिकाणी श्वास कोंडलेली झाडे दिसून येतात. त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही. शहराची लोकसंख्या पाहता प्रत्येक झोनमधून पाच ते दहा लोक जरी या मोहिमेसाठी एकत्र आले तरी झाडांचा श्वास मोकळा होईल. – निशांत डहाके.