लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी ‘नेट’ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ही परीक्षा १३ ते १७ जून दरम्यान घेतल्या जाणार आहे. ८३ विषयांसाठी संगणक आधारीत चाचणी पध्दतीने ही परीक्षा होणार. देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठ तसेच शैक्षणीक संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक तसेच ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधंनकारक आहे.

जाहीर झालेल्या पत्रकानुसार वाणिज्य, शारीरिक शिक्षण, ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयांची परीक्षा १३ जूनला होणार. इंग्रजी, गृहविज्ञान व संस्कृत विषयाची १४ जूनला तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, पर्यावरण विज्ञान या विषयाची १५ जूनला होईल. इतिहास, व्यवस्थापन (व्यवसाय प्रशासन, मार्केटींग, एमजीटी, औद्योगिक संबंध व सहकारी व्यवस्थापन), कायदा या विषयाची १६ जूनला तर संगणक विज्ञान, अनुप्रयोग, हिंदी व समाजशास्त्र या विषयासाठी १७ जूनला परीक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे. परीक्षे विषयीचा सविस्तर तपशील युजीसीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Net exam schedule announced pmd 64 mrj