नागपूर : परीक्षेतील गैरप्रकारामुळे राज्यभर गाजत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीमध्ये पुन्हा नवीन वाद समोर आला आहे. रविवारी नागपूर येथील रायसोनी महाविद्यालय रिया टॉवर येथे दुपारी २.३० वाजता शिपाई पदासाठी परीक्षा सुरू झाली.

मात्र, परीक्षेच्या दहा ते पंधरा मिनीटांनीही सॉप्टवेअर बंद पडले. यामुळे परीक्षा थांबली. परीक्षा नियंत्रकांनी हा तांत्रिक गोंधळ असून दहा मिनीटात परीक्षा सुरू होईल असे सांगितले. मात्र, त्यानंतर ५ वाजतापर्यंत परीक्षा सुरूच झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. परीक्षेत गोंधळ झाल्याने येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Guillain Barre syndrome treatment
‘जीबीएस’च्या उपचारांवरून आमदारांची नाराजी, अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा
Testing of water supplied through tankers wells borewells due to GBS disease pune
पिंपरी: ‘जीबीएस’चा धोका वाढला! टँकर, विहिरी, बोअरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी
Sanitary napkin
परीक्षेला पोहोचताच विद्यार्थीनीला आली मासिक पाळी, तिने सॅनिटरी पॅड मागताच महाविद्यालयाच्या कृतीवर सर्वांनीच व्यक्त केला संताप!
crop insurance scam loksatta news
बडे राजकारणी + विमा कंपन्या = पीक विमा घोटाळा
District Bank Recruitment Financial hardship due to change of examination center alleges
जिल्हा बँक नोकरभरती : परीक्षा केंद्र बदलल्याने आर्थिक भुर्दंड, परीक्षार्थीचा आरोप…
importance of NAAC accreditation for colleges
काही महाविद्यालयें नॅकला सामोरी का जात नाहीत?

हेही वाचा…नागपूरकरांवर का आली ‘चिपको आंदोलना’ची वेळ

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ९७ शिपाई पदांसाठी ऑनलाइन परीक्षा शनिवारी २१ डिसेंबरलाही घेण्यात आली होती. तांत्रिक बिघाडामुळे ती रद्द करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याची हमी देण्यात आली, त्यांच्यासाठीच तांत्रिक बिघाड करण्यात आल्याचा आरोप परीक्षार्थ्यांकडून करण्यात आला होता. विशेष म्हणजे ही परीक्षा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक या दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेण्यात आली.

येथील परीक्षा केंद्रांवरही गोंधळ झाल्याच्या तक्रारी होत्या. या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार म्हणजे प्रत्येक जागेसाठी ४० लाख रूपये घेतल्या गेल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला होता. त्यामुळे परीक्षेसंदर्भात सुरुवातीपासूनच अनेक उमेदवारांच्या मनात शंका होती. त्यानंतर मागील आठवड्यात पेपर सोडवताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते सेव्ह करताच लिहिलेले उत्तर बदलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. याची दखल घेत अर्ध्या तासांनी पेपर रद्द करून परीक्षा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यानंतर आता रविवारी झालेल्या परीक्षेतही असाच प्रकार समोर आला.

हेही वाचा…राज्यात ‘पीएसआय’ पदाच्या तीन हजार जागा रिक्त, विद्यार्थी म्हणतात…

सखोल चौकशीची मागणी

रविवारी शिपाई पदासाठी झालेल्या परीक्षेसाठी विविध जिल्ह्यातून उमेदवार आले होते. दुपारी २.३० ते ४.३० या वेळात परीक्षा होती. उमेदवार परीक्षा केंद्रात गेल्यावर २.३० वाजता पेपर सुरू झाला. यावेळी संगणकावर दुसऱ्याच उमेदवारांचे प्रोफाईल उघडल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. ही समस्या दहा मिनीटांनी दूर करण्यात आली. त्यानंतर नियमित पेपर सुरू झाला. परंतु काही वेळातच सॉप्टवेअरमध्ये बिघाड आला. त्यामुळे परीक्षाच बंद झाली. हा तांत्रिक बिघाड असून दहा मिनीटात परीक्षा सुरू होईल असे सांगण्यात आले. परंतु, सायंकाळी ५ वाजतापर्यंत परीक्षाच सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ झाला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

Story img Loader