नागपूर: जिल्ह्यात सलग तीन दिवस करोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र होते. परंतु गुरूवारी २४ तासांत तब्बल ९५ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली असून जिल्ह्यातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ३५० वर पोहचली आहे.  जिल्ह्यात १९ जून रोजी ७२ रुग्ण आढळले होते. त्यानंतर २० जूनला १७, २१ जूनला ३७, २२ जूनला १८ रुग्णांची नोंद झाली होती.  पण,गुरूवारी शहरात ५१, ग्रामीणला ४४ असे एकूण ९५ रुग्ण आढळले. अचानक झालेल्या रुग्णवाढीने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३५० झाली आहे. जिल्ह्यात ९५ नवीन रुग्ण आढळल्याने चाचण्यांच्या तुलनेत सकारात्मक अहवालाचे प्रमाण ३.२६ टक्के नोंदवण्यात आले. यापैकी शहरात २.२० टक्के आणि ग्रामीणला हे प्रमाण ७.३२ टक्के होते.

Story img Loader