वर्धा : नवे शैक्षणिक धोरण २०२० लागू झाले आहे. १०+२+३ ऐवजी आता ५+३+३+४ अशी संरचना अमलात येईल. त्यात पायाभूत ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश आहे. राज्य शासनाने या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण खात्यामार्फत सुकाणू समिती गठीत केली आहे.

हेही वाचा – वाघाच्या डरकाळ्यांनी गावकरी भयभीत; वनविभाग अलर्ट मोडवर

हेही वाचा – सप्टेंबरअखेरपर्यंत पाठ्यपुस्तके मराठीत? मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करून देण्यास शिक्षण विभाग आग्रही

शालेय शिक्षण मंत्री हे अध्यक्ष असून विविध सहा वरिष्ठ अधिकारी सदस्य आहेत. तसेच दहा वेगवेगळ्या गटातून अशासकीय सदस्य घेण्यात आले आहेत. त्यात शिक्षण तज्ञ गटात रमेश देशपांडे मुंबई व रेवती श्रीनिवासन ठाणे यांचा समावेश आहे. तर बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. विद्युत खांदेवाले अमरावती, डॉ. अरुंधती भालेराव ठाणे, बाल विशेषज्ञ मालविका झा टाटा ट्रस्ट मुंबई व संतोष भांगे ठाणे, योग्यता चाचणी तज्ञ फादर जॉन रोझ व यास्मिन कविना मुंबई, क्रीडा तज्ञ प्रद्युम्न जोशी नाशिक, सांस्कृतिक तज्ञ प्रदीप ढवळ ठाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीवर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याचा प्रभाव दिसून येतो.

Story img Loader