नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान यांना तथाकथित पती अमित शाहू हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक राजकीय नेत्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे शारीरिक संबंधासाठी पाठवत होता. त्यांच्या शारीरिक संबंधाच्या चित्रफिती आणि अश्लील छायाचित्र काढण्यात येत होते. अश्लील चित्रफितीचा धाक दाखवून अमित लाखो रुपये उकळत होता, असा आरोप ठेवत मानकापूर पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सना खान हत्याकांडाने धक्कादायक वळण घेतले असून आता राजकीय क्षेत्रात लवकरच मोठा भूकंप येणार असल्याचे बोलले जाते.

भाजपा नेत्या सना खान यांची ओळख दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरून जबलपूरमधील कुख्यात गुंड अमित शाहू याच्याशी झाली होती. त्यानंतर सना खान या मध्यप्रदेशात आयोजित भाजपाच्या एका शिबिरात गेल्या होत्या. तेथे सना खान आणि अमित शाहू यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सना यांच्या संपर्कात भाजपाचे मोठमोठे नेते असल्याचे अमितने हेरले. त्याने सना यांच्या या जनसंपर्काचा गैरफायदा घेऊन पैसे कमवण्याचा कट रचला. विवाहित असलेल्या अमितने सना यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. अमितला मध्यप्रदेशातील राजकारणात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे त्याने सना खान यांचा वापर करण्याचे ठरवले. अमित यांनी सना यांच्याशी लग्न केले. त्यानंतर राजकारणात प्रवेश आणि कोट्यवधी रुपये कमावण्यासाठी सना यांना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत रात्र घालवण्यासाठी दबाव टाकला. सना यांना अनेक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास बाध्य केले. शारीरिक संबंधाच्या चित्रफिती आणि छायाचित्रे काढण्यात आली. या अश्लील चित्रफिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन काहींकडून अमितने लाखो रुपये उकळले. तर त्याच अश्लील छायाचित्रांद्वारे अमितचा राजकारणात प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल

हेही वाचा – कांद्याच्‍या दरात आठवडाभरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ; निर्यात शुल्‍कवाढीने कांदा उत्‍पादकांमध्‍ये रोष

अमित शाहू याचा मोबाईल मानकापूर पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्या भ्रमणध्वनीमध्ये सना खान यांच्या काही अश्लील चित्रफिती आणि छायाचित्र आढळले. त्या चित्रफितीत अमित शाहूच्या दबावावरून सना खान या काही राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत असल्याचे दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आयटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी मानकपूरच्या ठाणेदार वानखडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – चंद्रपूर : भाजपाच्या ‘घर चलो अभियाना’ची सुरुवात रिपाइं, ओबीसी नेत्याच्या घरून

अनेकांची पदे धोक्यात येणार

सना खान यांच्या काही चित्रफिती महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील राजकीय पदाधिकाऱ्यांसोबतच्या आहेत. अमितने राजकीय कारकीर्द सुरू करण्यासाठी त्या अश्लील चित्रफितींचा वापर केला आहे. या चित्रफितींमुळे अनेकांची पदे धोक्यात येणार असून मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Story img Loader