लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
नागपूर: चुकीच्या पद्धतीने वाहन पार्किंग केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यासाठी कायदा केला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत संकेत दिले.
चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळे देशातील अनेक शहरांत रस्त्यांवर अनेकदा वाहतूक खोळंबते. यातून सुटका करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय विशेष तयारी करत आहेत. या खात्याचे मंत्री नितीन गडकरींनी यापूर्वीही अनेक कार्यक्रमांमध्ये याबाबत घोषणा केल्या आहेत. जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केले तर एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहितीही आहे चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी हा कायदा आणला जात आहे.
First published on: 20-06-2023 at 11:33 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New law is coming for traffic jams in the metropolis hint by union minister nitin gadkari cwb 76 mrj