वर्धा : शासनाने पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी बक्षी समिती गठीत केली होती. त्यानुसार सर्व पातळीवरील शाळांच्या मुख्याध्यापकांना वेतनश्रेणी मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त अकरावी व बारावीचे वर्ग असणाऱ्या स्वतंत्र उच्च माध्यमिक म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना ही नवीन वेतनश्रेणी लागू झाली नव्हती. स्वतंत्र म्हणजे जे माध्यमिक शाळांशी सलग्न नाहीत असे. या उच्च माध्यमिक शाळांचेच मुख्याध्यापक सुटले होते. त्यांनाही आता लाभ मिळणार आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : ‘अंबुजा, अदानी परत जा’, जनसुनावणीमध्ये प्रकल्पग्रस्तांची सिमेंट कंपनीविरोधात घोषणाबाजी

इतर उच्च माध्यमिक प्रमाणे जुन्या ४४ ९००- १४२४०० या श्रेणी ऐवजी ४७६०० – १५११०० ही श्रेणी मिळणार. मात्र तो मुख्याध्यापक पदव्युत्तर पदवीधर व बी.एड असावा. पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ जानेवारी २०१६ पासून हे लाभ मिळणार आहेत. तसेच तबलजी या पदाससुद्धा नवी वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यांना १९९०० – ६३२०० ऐवजी आता २५५०० – ८११०० अशी सुधारित श्रेणी मिळणार. मात्र, पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार नसल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New pay scale for principals but who will benefit read in detail pmd 64 ssb
Show comments