वर्धा : एलपीजी कंपनीद्वारे आता ग्राहकांना ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर मोबाइलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या घरी सिलेंडर येईल, तेव्हा ओटीपी सांगावा लागेल. तेव्हाच गॅस सिलेंडर मिळेल व डिलिव्हरी यशस्वी होईल. तुम्ही ज्या मोबाईलवरून सिलेंडर बुक केले आहे, तो मोबाईलधारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ उडू शकते. त्यामुळे यापुढे गॅस सिलेंडर घेताना जरा नियोजन करावं लागेल. त्यासाठी आधीच गॅस बुकिंग निश्चित झाल्याचा मेसेज घरातील इतरांनाही पाठवून ठेवावा लागणार आहे.

आजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग करत होता, यापुढेही त्याच पद्धतीने फोनवरूनच बुकिंग करावं. मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. मात्र असे असले तरी या नव्या नियमाने ग्राहकांची चांगलीच अडचण होईल व सिलेंडर साठी वितरकांसोवत अनेकदा खटके उडू शकतील, अशी शक्यता ग्राहक हक्कचे डॉ. श्याम भूतडा व्यक्त करतात.

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Boy killed in gas cylinder blast karad
गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

हेही वाचा >>>नागपूर: शेतकरी पुत्राचा पुन्हा सन्मान! राजू केंद्रे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार

घरगुती वापराचा सिलेंडर बुक केल्यावर काही दिवसांनंतर एजन्सीचे कर्मचारी तो घरपोच करतात अशी सध्याची पद्धत आहे. मात्र यात आता महत्वाचा बदल होणार आहे. ओटीपीशिवाय सिलेंडरची होम होम डिलेवरी होणार नाही. यापूर्वी पण हा नियम होताच. परंतू तो आता अनिवार्य करण्यात आला आहे.सिलेंडर ऑनलाईन बुक केल्यावर  ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलेव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागेल. अन्यथा ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

गॅस सिलेंडर बुकींग व डिलिवरीची नवीन प्रक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅसची बुकींग करण्यावरच आता ही प्रक्रिया थांबणार नाही. बुकींगनंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल. ज्यावेळी सिलेंडर डिलिव्हरी बॉय घरी येईल, तेव्हा त्या व्यक्तीसोबत ग्राहकांनी हा ओटीपी शेअर करणं अपेक्षित असेल.  ग्राहकांचा मोबाईल नंबर अपडेट नसल्यास डिलीव्हरी पर्सन  अॅपच्या माध्यमातून  रिअल टाईम अपडेटही करु शकणार आहे. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी त्या अॅपच्या साह्याने तुम्ही मोबाईल नंबर डिलिवरी बॉयच्या सहाय्यानं अपडेट करु शकाल. अॅपच्या माध्यमातून रिअल टाईम बेसिसवर मोबाईल क्रमांक अपडेट होईल. त्यानंतर त्याच क्रमांकावर कोड जनरेट करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. हा नवा बदल कसोशीने अंमलात आणल्या जाणार आहे.

हेही वाचा >>>कारण राजकारण: दिग्रसमध्ये राठोड यांचा प्रचार भाजप करणार? ‘मविआ’कडून कोणाला उमदेवारी?

सिलेंडर वितरकांचे म्हणणे काय?

ही नवी प्रक्रिया डोकेदुखी ठरणार असल्याचे म्हटल्या जाते. कारण नोंदणी करणारा मोबाईलधारक घरी नसल्यास डिलिव्हरी बॉय सिलेंडर देणार नाही. अनेकांचे मुले घराबाहेर असतात. ते बुकिंग करीत पैसे भरून टाकतात. पण घरी जर वृद्ध आईवडिलास  ओटीपी सांगता आला नाही तर सिलेंडर मिळू शकणार नाही. याविषयी बोलतांना इब्राहिमजी आदमजी गॅस एजेन्सीचे आसिफ जाहिद म्हणाले की आता अनिवार्य झाले आहे. पण ही सिस्टीम डोकेदुखीची ठरणार असल्याचे आम्ही वितरकांनी कंपन्यांना कळविले होते. पण काळानुरूप लोकं जुळवून घेतील. तक्रारी टप्प्या टप्प्यात दूर होती. त्रास होवू नये, याची काळजी घ्या. मुख्य म्हणजे या पद्धतीबाबत जागरण आवश्यक आहे. तसेच गॅस जोडणी असणाऱ्या कुटुंबाने  वितरकाकडे अधिकृत एकच नंबर नोंदवावा. कारण एका नंबरवर नोंदणी झाल्यास त्यावरून एक महिना झाल्याशिवाय दुसऱ्यावेळी सिलेंडर मागणी करता येणार नाही.