वर्धा : नीट पदवीधर २०२४ परीक्षेसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अभ्यासक्रम जाहीर केला आहे. अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड कडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे. पुढील वर्षी ५ मे २०२४ रोजी होणाऱ्या परीक्षेस हा अभ्यासक्रम राहणार.नीट प्रश्नपत्रिकेचे दोन विभाग राहतील.
अ भागात ३५ तर ब भागात १५ प्रश्न राहणार. पात्रता परीक्षेत उमेदवारांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयात किमान५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. एमबीबीएस, बिडीएस व इतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजेन्सी तर्फे घेतल्या जाणारी ही सर्वात मोठी परीक्षा असते.