देवेश गोंडाणे

नागपूर : Talathi recruitment candidate scam राज्यातील तलाठी पदभरती २०१९मध्ये झालेल्या घोटाळय़ाला नवे वळण आले असून, मुंबई पोलीस भरती-२०२३ पेपरफुटी प्रकरणात पुणे तलाठी भरती २०१९ मध्ये उत्तीर्ण उमेदवार अंकुश काळे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे अंकुश काळे तलाठी भरतीमध्ये गैरमार्गाने उत्तीर्ण झाला, हे निश्चित असल्याने तलाठी भरतीच्या घोटाळय़ाची नव्याने सखोल चौकशी करण्याची गरज अधिक बळावली आहे.

Hoardings, Navi Mumbai, MLA, businessmen,
नवी मुंबई : भावी आमदारांची फलकबाजी, जागोजागी लागलेल्या होर्डिंगमुळे शहर विद्रुप, फलक व्यावसायिकांना नोटिसा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Tamil Nadu Crime News
Tamil Nadu Crime News : शेजाऱ्याने वैमनस्यातून तीन वर्षांच्या मुलाची केली निर्घृण हत्या; वॉशिंग मशीनमध्ये लपवला मृतदेह, महिलेला अटक
girl molested in kolkata
राज्यात महिला अत्याचारविरोधी कायदा पारित होत असतानाच कोलकात्यात महिलेचा विनयभंग; दोघांना अटक
chhattisgarh police managed to kill 9 Naxalites
छत्तीसगडमधील चकमकीत एका जहाल नेत्यासह ९ नक्षलवादी ठार
live worms found in chocolate distributed to students in rajura taluka
चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या, सोंडे; ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’अंतर्गत विद्यार्थांना वाटप
Vasant Chavan Passes Away News in Marathi
Vasant Chavan Death : पदावर असताना मृत्यू पावलेले नांदेड जिल्ह्यातील चौथे लोकप्रतिनिधी !
Assam minor gangrape case
Assam Minor Gangrape Case : आसाम सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, पोलीस म्हणाले, “घटनास्थळी घेऊन जात असताना त्याने…”

महापरीक्षा संकेतस्थळावरून झालेल्या २०१९च्या तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाले. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकारात्मक अहवाल असतानाही महापरीक्षा संकेतस्थळाचे तत्कालीन संचालक अजित पाटील आणि महसूल विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी या पदभरतीची सखोल चौकशी न करता नियुक्त्या दिल्याचा आरोप आहे. मात्र, आता मुंबई पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणात पकडलेला आरोपी अंकुश काळे २०१९च्या तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

२०१९च्या तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार करून नोकरी मिळवल्यावरही त्याने हा प्रकार बंद केला नाही. मुंबई पोलीस भरतीमध्ये पुन्हा एकदा गैरप्रकार करण्यामध्ये त्याला पकडले. त्यामुळे परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांमुळे सामान्य होतकरू विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने तलाठी भरतीची पुन्हा एकदा चौकशी करणे आवश्यक झाले आहे. यामुळे अनेक गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे.

पोलीस भरतीमधील गैरप्रकारांचीही चौकशी

मुंबई पोलीस विभागातील पोलीस शिपाई यांच्या ७०७६ आणि पोलीस शिपाई चालक यांच्या ९९४ पदांसाठी भरती प्रक्रिया २०२१मध्ये राबवण्यात आली. सदर भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेत काही उमेदवारांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई पोलीस भरती प्रक्रियेमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी इतर आस्थापनेमधील भरती प्रक्रियेमध्ये गैरवर्तन केले असण्याची शक्यता आहे. यामुळे दोन वर्षांमध्ये पोलीस भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांनी गैरप्रकार केला व ज्यांच्याबद्दल कारवाई केली, अशा उमेदवारांची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षकांना मागविण्यात आल्याचे मुंबई येथील पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

मुंबई पोलीस भरतीच्या गैरप्रकारामधील आरोपी हा २०१९ च्या तलाठी भरतीत उत्तीर्ण झाला. यावरून भरतीमध्ये किती गैरप्रकार झाला, हे दिसून येते. त्यामुळे घोटाळय़ाप्रकरणी महसूल विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. – नीलेश गायकवाड, सचिव, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

अंकुश काळेचा गैरप्रकारांचा आलेख

नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस भरती-२०२३ पेपरफुटीत पुणे तलाठी भरती २०१९ मध्ये उत्तीर्ण उमेदवार अंकुश काळे हा आरोपी आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस भरती २०२१ मध्ये केलेल्या गैरप्रकारात त्याला अटक झाली होती. त्यामुळे २०१९ तलाठी भरती गैरप्रकारांचा तपास करणे गरजेचे झाले आहे.