नागपूर : सर्वसामान्यांच्या नियमित खाण्यातीलच एक खाद्य म्हणजे अंडी. मात्र, ही अंडी आता हळूहळू महाग होऊ लागली आहेत. अंड्यांचा दर शेकड्याला ६०० ते ६५० रुपये झाला आहे. थंडीच्या हंगामात मांसाहार जास्त केला जातो. जे मांस खात नाहीत, त्यांच्यासाठी मध्यम मार्ग म्हणजे अंडी. ती उष्ण आणि अधिक प्रमाणात प्रोटिन्स देणारी असतात. त्यामुळे साधारणपणे या काळात अंड्यांच्या मागणीत वाढ होते. परिणामत: दरदेखील वाढतात. पण, यंदा थंडीपूर्वीच अंडी महाग झाली आहेत. यामागे अंड्यांच्या उत्पादन खर्चातही वाढ झाल्याने दर वाढल्याचे कारण सांगण्यात येत आहे. थंडीत मागणी वाढती राहणार असून, अंड्याचे वाढलेले दर जानेवारीच्या मध्यापर्यंत कायम राहतील, असे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात अंडी कुठून येतात?

नागपुरात हैदराबाद तसेच आंध्र प्रदेशातील काही शहरांतून अंडी येतात. मागील महिन्यात ठोक बाजारात अंड्याचा दर ५०० ते ५५० रुपये प्रतिशेकडा होता. यामध्ये अचानक वाढ झाली आहे. दरम्यानच्या काळात दोन दिवस सर्वत्र गारवा जाणवला. यामुळेदेखील दरवाढ झाल्याची माहिती आहे. दरवाढीमागे अंड्याची आवकदेखील कारणीभूत असते. सध्या हैदराबादमधून चांगली आवक सुरू आहे. परिणामत: होत असलेली दरवाढ अजून काही दिवस कायम राहणार आहे. दिवाळीनंतर थंडीमध्ये होणारी वाढ पाहता हा आकडा शेकड्यामागे ७५० रुपयांपर्यंत जाणार आहे. सध्या शहरातील बाजारपेठेत जिल्ह्याच्या विविध भागांतून व परराज्यातूनदेखील आवक होत आहे. उपराजधानीत दिवसाकाठी १० ते १२ लाख अंड्यांची मागणी असते. परंतु, हिवाळ्यात ती थेट १५ ते २० लाख इतकी होते.

हेही वाचा…नानाजी देशमुख राष्ट्रीय पंचायतराज पुरस्काराने तिरोडा पंचायत समिती सन्मानित

अंडी खाण्याबाबत तज्ञ काय सांगतात

हिवाळ्यात अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात अंडी खातात. त्यामुळे त्यांची मागणी देखील वाढते. हिवाळ्यात अंड्यांच्या दरात वाढ देखील होते. अंडी ही पौष्टिक तर आहेतच पण त्यातून लगेच ऊर्जा मिळते. अंडी खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहते. याशिवाय आजारांपासूनही ते दूर ठेवते. हिवाळ्यात अंडी शरीराला उबदार ठेवतात. पण हिवाळ्यात रोज किती अंडी खावी? याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया. माफसूचे प्राध्यापक डॉ. मुकूंद कदम सांगतात की, अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि बी१२, लोह, जस्त आणि सेलेनियम गोष्टी आढळतात. याशिवाय त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिडही असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. अंडी खाण्याचे प्रमाण व्यक्तीचे वय, आरोग्य, जीवनशैली आणि इतर सवयी यावर अवलंबून असते.

हेही वाचा…लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’

हिवाळ्यात अंडी खाण्याचे फायदे

हिवाळ्यात शरीराला अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. कारण थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. अंड्यांमध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी असते. ज्यामुळे ते शरीराला पुरेशी ऊर्जा प्रदान करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील अंडी महत्त्वाची असतात. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक वाढते. हिवाळ्यात लोक सहसा सूर्यप्रकाशात कमी जातात. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते. अशा परिस्थितीत ही कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्ही अंडी खाऊ शकता असेही तज्ञ सांगतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ngapur egg prices risen early this year due to increased production costs dag 87 sud 02