अज्ञात वाहनाच्या धडकेने सोमवारी एक नीलगाय ठार झाली होती. हा अपघात ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या महामार्गावर घडल्याचे सांगितले जात होते. परंतु, हा अपघात अमरावती-अकोला महामार्गावर बोरगाव मंजूजवळ घडल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील अमरावती ते अकोलादरम्यानचा रस्ता १०७ तासांत ७५ किलोमीटरपर्यंत बांधणीच्या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली होती. हा भाग लोणी ते माना या दरम्यान असून नीलगायीचा मृत्यू हा या भागाच्या समोर बोरगाव मंजू बायपासवर झाल्याचे महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या ठिकाणीही रस्त्याचे डांबरीकरण झाले असून वाहनांचा वेग त्यामुळे वाढला आहे.

Story img Loader