ब्रम्हपुरी येथील बहुचर्चित ‘सेक्स रॅकेट’ आणि बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा या तीन जिल्ह्यातील नऊ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणात आणखी काही प्रतिष्ठित मंडळी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात काही राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यापासून तर मद्यविक्रेता व शिक्षकाचाही समावेश आहे.
नागपूर, कोलकाता तथा देशातील इतर मेट्रो शहरातून ब्रम्हपुरी येथे मुली आणून त्यांच्याकडून देहव्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ब्रम्हपुरी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. कोलकाता येथून अपहरण करून आणलेल्या एका अल्पवयीन मुलीकडून ब्रम्हपुरीतील विदर्भ इस्टेट कॉलनीत भाड्याने बंगला घेऊन राहणारे लोणारे दाम्पत्य देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत होते. १७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अल्पवयीन मुलीची लोणारे दाम्पत्याच्या तावडीतून सुटका केली. ब्रम्हपुरी पोलिसांनी मानव तस्करी अधीनियम, पोक्सो, पिटा ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदवून मंजित रामचंद्र लोणारे (४०) व चंदा मंजीत लोणारे (३२) यांना अटक केली. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता त्यात प्रतिष्ठीत मंडळी सहभागी असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी वडसा येथील अरविंद इंदूरकर (४७), शिवराम हाके (४०), राजकुमार उंदिरवाडे (४२), मुकेश बुराडे (२८) तर लाखांदूर येथील प्रकाश परशुरामकर (३५), सौरभ बोरकर (२२), गौरव हरिणखेडे (२८) याआरोपींना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली.
हेही वाचा : नागपूर : ब्रम्हपुरीतील मुलीवर बलात्कार प्रकरणात आणखी ५ आरोपी , राजकीय नेत्यांचाही समावेश
ब्रम्हपुरी ‘सेक्स रॅकेट’ प्रकरणाचे जाळे नागपूर, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पसरले आहे. येत्या काळात या प्रकरणी आणखी तीन ते चार जणांना अटक होण्याची शक्यता आहेसर्व आरोपींवर पोक्सो, पिटा या कलमासह ३७६, (३) या कलमाची वाढ करण्यात आली आहे. सध्या सर्व नऊ आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत