गोंदिया : बलरामपूर (छत्तीसगड) जिल्ह्यातील सामरी पोलीस स्टेशन परिसरात आणि लगतच्या झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नऊ नक्षलवाद्यांनी बलरामपूरचे पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांच्यासमोर २५ एप्रिल, मंगळवारी आत्मसमर्पण केले. यापैकी तीन नक्षलवाद्यांनी एक लोडेड बंदूक आणि एकाने आयईडी आणि स्फोटकांसह आत्मसमर्पण केले आहे. यातील बहुतांश नक्षलवादी हे शस्त्र चालवण्यात, नक्षलवादी पथकात सेन्ट्री ड्युटी करण्यासोबतच सुरक्षा दलांशी सामना आणि आयईडी पेरण्यातही निपुण आहेत. यापूर्वीही सात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.

पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी सांगितले की, बलरामपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांच्या विरोधात सतत शोधमोहीम राबवली जात आहे. भूतकाळात, ऑपरेशन्सदरम्यान, बलरामपूर पोलिसांनी समरीपथ पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी पोलीस दलाला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने भूगर्भात पेरलेले आयईडी आणि इतर स्फोटक साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले होते. बलरामपूर पोलिसांची नक्षलवाद्यांविरुद्धची सततची कारवाई आणि शोध मोहिमेचा दबाव आणि पोलीस स्टेशन समरीपथच्या हद्दीतील पुंडग आणि भुताहीमोड या गावांमध्ये नवीन छावण्या सुरू करणे, दुर्गम नक्षलग्रस्त भागात सुरू असलेले जनजागृती कार्यक्रम यामुळे हे नक्षलवादी प्रभावित झाले आहेत. नक्षल भागातील कारवायात यापूर्वी सात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. यावेळी नऊ नक्षलवाद्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी बलरामपूर जिल्ह्यातील सामरी पोलीस स्टेशन हद्दीतील पुंडग, पाचफेडी, चुनचुना, पिपरदाबा या गावांचे रहिवासी आहेत. या सर्व नक्षलवाद्यांनी कमांडर स्पेशल एरिया कमिटी विमल यादव आणि रिजनल कमिटीचे कंपनी कमांडर नवीन यादव, शेखर कोरवा, जगदीश बुधा, विनय, बिरसाई, रवी आदींसोबत सामरी पोलीस स्टेशन परिसरात आणि सीमा झारखंडमध्ये सक्रिय काम केले आहे. झारखंडमधील बुधापहाड भागात नक्षलवादी संघटनेसोबत सतत काम केलेले आहेत. आयईडी पेरण्याबरोबरच काही नक्षलवादी सेन्ट्री ड्युटी, अन्न तयार करणे आणि पोलिस दलावर हल्ल्याच्या घटनांमध्येही सहभागी राहिलेले आहेत. पोलीस आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या दबावामुळे हे सर्वजण मध्यंतरी काही काळ लपून राहत होते. वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित

हेही वाचा… फडणवीस यांच्या नागपुरात अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून फलक

हेही वाचा… गडचिरोली: पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र; वनरक्षकासह सात जण अटकेत

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी सुनवा कोरवा याने एक किलो आयईडी, स्फोटके आणि नक्षलवादी मिथलेश, अजय आणि जंगली कोरवा यांनी प्रत्येकी एक लोडेड बंदुकीसह आत्मसमर्पण केले आहे. अखिलेश उर्फ अजय कोरवा (३२) रा.चुनचुना, पाचफेडी पारा पोलीस स्टेशन समरीपथ, अखिलेश कोरवा उर्फ मिथलेश (२५) रा. चुनचुना, पाचपेडी lपारा समरीपथ, जय प्रकाश कोरवा उर्फ निर्मल (१८) रा. चुनचुना, पाचपेडी पारा समरीपथ, झालू कोरवा उर्फ प्रवीण (३०) रा.चर्हू ता.सामरीपथ, जंगली कोरवा उर्फ विक्रम (२९), बिरसाई कोरवा उर्फ बिरसाई (३३) रा.चुनचुना, पाचफेडी समरीपथ, दिनेश कोरवा उर्फ दिनेश (२६) रा.पुंडग, ता.सामरीपथ, जवाहीर सिंग खैरवार (२७) रा.पुंडग, समरीपथ, सुनवा कोरवा (५०) रा.पिपरधाबा, समरीपथ, अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.