बुलढाणा : ऐन रंगपंचमीच्या दिवशी मोताळा तालुक्यातील तालखेड येथील नऊ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. एकूलत्या एक मुलाच्या निधनाने आई-वडील व नातेवाईकांच्या शोकाला पारावर उरला नाही. यामुळे काल रात्री गावातील एकाही घरातील चूल पेटली नाही.
हेही वाचा – मुंबई बाहेर जाण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख पुन्हा न्यायालयात
हेही वाचा – भंडारा : विहिरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल साडेपाच तासांनंतर सुखरूप सुटका
कुणाल रामदास वैतकार (वय ९ रा तालखेड, तालुका मोताळा) असे बालकाचे नाव आहे. इयत्ता तिसरीत शिकणारा कुणाल एकूलता एक असल्याने आई-वडिलांचा जीव की प्राण होता. काल मंगळवारी ( दि. ७) त्याने दिवसभर रंगपंचमीचा आनंद लुटला. संध्याकाळी तो काकाच्या मुलासह गावा नजीकच्या पाटात पोहायला गेला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून दगावला. सोबतच्या चुलत भावाने आरडाओरड करून गावकऱ्यांना आणले. कुणालला बुलढाणा येथे उपचारासाठी नेत असताना त्याचे निधन झाले.