वर्धा: निसर्गसाथी फाउंडेशनच्या वतीने तहसील कार्यालय हिंगणघाट येथे असलेल्या पाणपक्षी घरटी गणना करण्यात आली. हिंगणघाट तहसील कार्यालय, पंचायत समिती, जि.प.उपअभियंता कार्यालय या परिसरामध्ये मागील शंभर वर्षांपासून पानपक्षांची मिश्र विन वसाहत दरवर्षी येथे बसत असते .यामध्ये प्रामुख्याने चार प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी पाहायला मिळते. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला येथे घरटी तयार व्हायला लागतात व ऑक्टोबर महिन्यापर्यंत या पक्षांचे प्रजनन पूर्ण होऊन ही वसाहत तिथून निघून जाते.

यावर्षी घरटी प्रगतीमध्ये एकूण सर्व प्रजाती मिळून ११६  घरटी मोजण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने सर्वाधिक घरटी गायबगळा या प्रजातीची होती दुसऱ्या क्रमांकावर रात बगळ्याची २६  घरटी आढळून आली छोटा बगळा या प्रजातीची १७  तर छोटा पानकावळा या प्रजातीची ११  घरटी आढळून आली. पहिल्यांदाच या गनने मध्ये भारतीय पानकावळा या प्रजातीची चार घरटी आढळून आली आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हेही वाचा >>>“गडचिरोलीत ‘सोशल पोलिसिंग’मुळे नक्षल चळवळीला तडा,” पोलीस अधीक्षक निलोपत्पल म्हणतात…

हेरोनरीला १०० वर्षाचा इतिहास

हेरोनरीला सारंगागार म्हणतात. हे पानपक्षी प्रजननासाठी समूहाने मानवी वस्तीमध्ये वसाहत करून हे पक्षी घरटी करतात. सारंगागार मधील प्रजनन अधिक प्रमाणामध्ये यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी कवट,चिंच,देशी बाभूळ या झाडांची लागवड होणे गरजेचे आहे. हिंगणघाट येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, जि.प.उपअभियंता कार्यालय या परिसरामध्ये मागील शंभर वर्षांपासून पानपक्षांची मिश्र विन वसाहत दरवर्षी येथे बसत असते . दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला येथे घरटी तयार व्हायला लागतात व ऑक्टोबर महिन्यापर्यंत या पक्षांचे प्रजनन पूर्ण होऊन ही वसाहत तिथून निघून जाते. गणना अधिकारी म्हणून पक्षीमित्र विदर्भ समन्वयक राहुल वकारे ,बोर फाउंडेशनचे सचिव अशोक भानसे,कोषाध्यक्ष पवन दरणे ज्ञानचंद गलवाणी,अमोल मुनेश्वर इत्यादी सहभागी झाले होते. निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू ,चैतन्य वावधने, यशवंत शिवनकर, निजाजुद्दीन सिद्दीकी, बालाजी राजूरकर, प्रभाकर कोळसे, यशवंत गडवार, कु.अंजोर कडू, केवलचंद सिंघवी,अजय मोहाड सहभागी झाले होते.घरटी गणनेची माहिती घेण्यासाठी तहसीलदार  योगेश्वर शिंदे , ना.तहसीलदार सागर कांबळे यांनी प्रगणने दरम्यान भेट देऊन माहिती जाणून घेतली.

हेही वाचा >>>गडचिरोली जिल्हा खनिज निधीवर नागपुरातील आमदारांचा डोळा?; जिल्हाबाहेरील कंत्राटदारांची रेलचेल वाढली

 बोनोलीचा गरुड

हा मोरंगी गरुड म्हणून पण ओळखल्या जाणारा शिकारी पक्षी आहे.अचानक झाडावर येऊन बसल्यामुळे सर्व पानपक्षांमध्ये दहशतीमुळे हालचाल आणि कल्ला सुरू झाला होता. निसर्गातील या हालचाली सर्व प्रगणकांना साक्षात डोळ्यांनी पाहता आल्या. हा गरुड भारतात सर्वत्र दिसून येत असला तरी तो दुर्मिळ समजल्या जातो. शक्तिशाली व धाडसी गरुडाची ही प्रजाती आहे. तो आपल्यापेक्षा मोठ्या आकाराच्या प्राण्याची किंवा पक्षाची सहज शिकार करतो. त्याचे झालेले आगमन पक्षीप्रेमीसाठी सुखद धक्का ठरल्याचे प्रवीण कडू म्हणाले.

Story img Loader