लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : वऱ्हाडी बोली व सोशल मीडियामुळे राज्यभर प्रसिद्धीस आलेले खदखद फेम नीतेश कराळे गुरुजी आता अधिकच अडचणीत आले आहे. आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हे दाखल होत नाही तोच आता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंगी पोलिसांनी यास दुजोरा दिला असून वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाल्याचे उत्तर मिळाले.

कराळे गुरुजी यांनी बांधकाम साहित्य वाटप वेळी उमरी गावात हस्तक्षेप केला होता. त्यावेळी गावातील आदिवासी कार्यकर्त्याने त्यास विरोध केल्यावर गुरुजींनी वाद घालीत शिवीगाळ केल्याची तक्रार झाली होती. त्यानंतर मतदान केंद्रावर पोहचणाऱ्या कराळे गुरुजींनी वाद घातला होता. तेव्हाही एका आदिवासी महिलेने तक्रार केली. मात्र गुन्हा दाखल नं झाल्याने भाजप नेत्या व नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाथे यांनी पत्रकार परिषद घेत दाद मागितली. कराळे गुरुजींवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

आणखी वाचा-अकोला : सहकार विभागाची मोठी कारवाई, अवैध सावकारीविरोधात धाडसत्र

अखेर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर सर्व कागदपत्रे असून तिथेच चौकशी सूरू असल्याचे सांगण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी यास दुजोरा देत चौकशी सूरू असल्याचे नमूद केले. तर खुद्द कराळे गुरुजी म्हणाले की मला कल्पना नाही. कारण ऑनलाईन तसे दिसत नाही.

या नव्या घडामोडीने कराळे गुरुजी यांच्यावरील कायद्याचा फास अधिक घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून कराळे यांना मान्यता मिळाली होती. त्यांनी लोकसभा निवडणूक नंतर या विधानसभा निवडणुकीत प्रचार सभा गजविल्या. मात्र उत्साहाच्या भरात ते उमरी गावात मतदान केंद्रावरील चौकशी करण्यास गेले आणि आचार संहिता भंग करून बसले. मुळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नको त्या शब्दात टीका करीत असल्याची बाब चर्चेत होती. त्याविषयी भाजप नेत्यांनी नाराजी पण नोंदविली.

आणखी वाचा- काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची नाराजी कशामुळे आहे याबाबत मला… पटोले थेटच बोलले…

गुरुजींना इंगा दाखवायचा असा काही भाजप नेत्यांचा मानस असतांनाच खुद्द गुरुजीच आता स्वतःच्या अति उत्साहात नको ते करून बसले व कारवाईच्या कक्षेत आल्याचे बोलल्या जात आहे. उमरी येथे वाद घातला म्हणून विविध गुन्हे, नंतर आचारसंहिता भंग व आता ऍट्रॉसिटीचा असे वेगवेगळे गुन्हे कराळे गुरुजींवर दाखल झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh karale guruji is now facing crime of atrocity pmd 64 mrj