अकोला : पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी येथे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला जिल्ह्यात रविवारी रात्री आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, “माझे कोणी काहीही करू शकत नाही. पोलिसांना भाषणाचे चित्रीकरण करू द्या. ते काहीही करू शकत नाहीत. भाषणाचे चित्रीकरण केवळ बायकोला दाखवतील. आमच्या राज्यात आमच्यावर काही करू शकणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही?”.

हेही वाचा – “देशात बहुसंख्य हिंदू, मग धार्मिक राजकारण कशासाठी?”, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “लाखो हिंदू कुटुंबांचे पलायन…”

हेही वाचा – “नेते, उद्योगपतींनंतर आता ईडी व्यापाऱ्यांना छळणार, सावध व्हा”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा; म्हणाले…

सर्वत्र अतिक्रमण केले जात आहे. राजरोसपणे हिंदू समाजाच्या कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरातून बळजबरीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, असा आरोप देखील नितेश राणे यांनी केला. हिंदू समाजावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. दरम्यान, नितेश राणेंच्या विधानावरून आता चौफेर टीका होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane akola statement what will the police do to us in our state controversial statement of nitesh rane ppd 88 ssb