नागपूर : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र द्वेषी आहे. ते राज्याला लागलेली कीड असून येत्या निवडणुकीत ती कायमस्वरूपी काढून टाकू ,अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केली. अकोल्याला जाण्यापूर्वी नितेश राणे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना किंमत राहिलेली नाही. त्यांचा सकाळचा भोंगा (संजय राऊत) काही तरी बडबड करतो आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आघाडीमध्ये किंमत राहिलेली नाही ,टीका त्यांनी केली. मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही, त्यांनी राजकीय भाष्य टाळले पाहिजे आणि त्यांच्यासाठी ते चांगले आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलले पाहिजे तर ते हिताचे आहे. नाना पटोले, शरद पवार यांची भूमिका ओबीसीतून आरक्षण न देता किंवा दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आहे मात्र उद्धव ठाकरे यांची याबाबत भूमिका नाही. त्यामुळे कुठेतरी जरांगे पाटील एकटे पडत चालले आहे असेही राणे म्हणाले. स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असल्यास त्यावर जरांगे यांनी भूमिका जाहीर करावी. जरांगे यांच्या या राजकारणामुळे मराठा समाजाचा नुकसान होईल. त्यामुळे मराठा समाज नक्कीच यावर भूमिका घेईल असेही राणे म्हणाले. जरांगे यांनी पहिल्या दिवशी एक कुठलीही भूमिका ठेवली असती तर विश्वास बसला असता. आता चारही बाजूने दरवाजे बंद व्हायला लागले आहे. हा तुतारीचा माणूस आहे हे लोकांना कळले आहे त्यामुळे समाजाचे लोक त्यांच्यापासून दूर होत आहे असेही राणे म्हणाले.
हेही वाचा…चंद्रपुरातील वाढती गुन्हेगारी, मुनगंटीवार म्हणाले ” गुंडासाठी फोन..”
पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समाजातील लव्ह जिहादचे विषय आल्यास १० ते १५ दिवस केस दाखल करत नाही. काही पोलीस अधिकाऱ्यामुळे पोलीस विभाग बदनाम होतो आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होत आहे. अशा सडक्या आंब्याना त्या पद्धतीचा आम्ही इशारा दिला दिला असल्याचे राणे म्हणाले.
हेही वाचा…ओबीसी विभागात कंत्राटी भरती! नियमित भरती नसल्यामुळे संघटना नाराज
आमदारांना म्हाडाची घरे दिली जात आहे, त्याबाबत अशी काही उदाहरण असतील तर संबंधित आमदारांनी ती भूमिका जाहीर करावी, पण काही सामान्य घरातील व्यक्ती आमदार होतात, पण सगळे आमदार आर्थिक सक्षम नसतात असेही राणे म्हणाले.अलिबागच्या जागेवर तीन पक्षाची युती असल्यामुळे चर्चा होईल. प्रत्येकाला वाटते की ही जागा मलाच मिळाली पाहिजे. त्यामुळे आम्ही एकमेकांचे डोके फोडू, असे काही होणार नाही. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणण्यासाठी आम्ही तडजोड करणार असल्याचे राणे म्हणाले.