गेल्या दोन दिवसांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत होतं. याप्रकरणावरून अखेर आदित्य ठाकरेंनी मौन सोडत दिशा सालियनचा मृत्यू झाला, तेव्हा माझ्या आजोबांचं निधन झालेलं. मी रुग्णालयात होतो, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं होतं. यावर आता भाजपा आमदार नितेश राणेंनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी बोलत राहावं, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. यावर आदित्य ठाकरे जेवढं बोलतील तेवढं एसआयटीचं काम सोप्प होणार आहे. १४ जूनला आदित्य ठाकरेंचे आजोबा पाटणकर यांचं निधन झालं. पण, १३ जूनला सुशांतसिंह राजपूतच्या घरी घटना झाली, त्याचा उल्लेख आम्ही करत आहोत. १३ जूनला आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवस होता. १३ जूनच्या रात्री २ वाजता आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकमेकांना ट्वीटरवर शुभेच्छा देतानाचा संवाद आहे,” असे नितेश राणेंनी सांगितलं.

हेही वाचा : “टॅक्सी समोर आणि मागे लाल दिव्याची गाडी…”, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना सांगितला ‘तो’ किस्सा

अनिल परब यांनी तेव्हा केलेल्या ट्वीटवरून नितेश राणेंनी सवाल उपस्थित केले आहेत. “अनिल परबांनी ट्वीट करत म्हटलं होते, कडक लॉकडाऊनच्या काळात सुशांतसिंह राजपूतच्या घरी पार्टी कशी झाली, त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होतं. अनिल परब कोणत्या पार्टीबद्दल उल्लेख करत आहेत. १३ जूनच्या तारखेला पार्टी झाली, हे अनिल परबांना कसं माहिती. म्हणून याप्रकरणी आम्हाला एसआयटीकडून चौकशी हवी आहे,” असं नितेश राणेंनी सांगितलं.

हेही वाचा : दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी तुम्ही कुठे होतात? आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले “माझ्या आजोबांचं…”

“दिशा सालियन प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे असल्याने मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं जाणार आहे. प्रत्येकाचे फोन रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. या सगळ्या गोष्टींची सत्यता बाहेर येणार आहे. कितीही खोट बोललं किंवा पट्ट्याचे वाघ बोलत राहिलं तरीही सत्य बाहेर येणार आहे. त्यांनी बोलत राहावे, अशी विनंती,” असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

“१३ जूनला तारखेला रात्री दिनो मोर्याच्या घरी पार्टी झाली. त्यापार्टीच्या नंतर हे लोकं सुशांत सिंहच्या घरी गेले होते. तिथे मोबाईल टॉवरच्या माध्यमातून कोण कोण होतं, हे समोर येईल. १३ जूनला आदित्य ठाकरे कुठे होते. ८ आणि ९ जूनला कुठे होते, याची माहिती एसआयटीने घ्यावी,” असे नितेश राणेंनी म्हटलं. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane on aaditya thackeray over disha salian case ssa
Show comments