नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालेली आहेत. सिंचन, कृषी, रस्ते, पायाभूत सुविधा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यंदा विकासाला मतदान करणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उत्तर नागपूरमध्ये दोन तासांपासून ईव्हीएम बंद, त्रस्त होऊन मतदार परतले

नितीन गडकरी यांनी कुटुंबासह महाल येथील महापालिकेच्या टाऊन हॉल येथे मतदान केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गडकरी यांचे मतदान मध्य नागपूर विधानसभा मतदान क्षेत्रांतर्गत येते. या मतदार संघात यंदा तिरंगी लढत आहे. येथून काँग्रेसकडून बंटी शेळके तर भाजपकडून प्रवीण दटके व अपक्ष रमेश पुणेकर हे उमेदवार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari along with his family voted at municipal town hall in mahal mnb 82 sud 02