नागपूर: नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी  सहकुटुंब कुंभ स्नानासाठी  रविवारी प्रयागराजला गेले. तेथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे विमानतळावर  स्वागत केले. गडकरी यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली.

प्रयाग राजांमध्ये सध्या कुंभमेळा सूरू आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब प्रयागराजला गेले होते. तेथे त्यांनी कुंभ स्नान केले. त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या सर्व कुटुंबासह प्रयाग राजांमध्ये दाखल झाले. तथे त्याच्या स्वागताला खुद्द मुख्यमंत्री योगीच उपस्थित होते. विमानतळावर त्यानी गडकरीचे स्वागत केले. यावेळी कांचन गडकरी उपस्थित होत्या.

गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. योगी नागपूरला आल्यावर गडकरींच्या निवासस्थानी भेट देतात. लोकसभा निवडणुकीत गडकरींच्या प्रचारासाठी योगी यांनी नागपुरात प्रचारसभा घेतल्या होत्या. गडकरी सुध्दा उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराला गेले होते. गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग बांधणी मंत्रालयाचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहेत.  त्यामुळे गडकरी कामासाठी प्रयागराजला येताच योगी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले.

प्रयागराज मधील कुंभमेळा आता विविध कारणांसाठी चर्चेत आहे. तेथे देशभरातून भाविक जात आहेत. त्यामुळे तेथे होणारी गर्दी, गंगास्नान, त्यासाठी करावी लागणारी पायपीट या सर्व बाबींची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत्यूंचा आकडा अद्याप जाहीर केला जात नाही. जो आकडा दिला जातो तो खोटा असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्याच बरोबरीने कुंभमेळ्याच्या ठिकाणी व्हीआयपींसाठी केलेली व्यवस्था चर्चेत आहे. त्यांच्या सोयीसाठी सरकारने लालगालिचा टाकला असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रयाग राजांमध्ये सहकुटुंब दाखल झाले आहे.

Story img Loader