निवडणूक आली की हा आमच्या जातीच्या किंवा तो आमच्या धर्माचा म्हणून उमेदवारी मागितली जाते. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी मोठ-मोठे फलक लावले जातात मात्र त्याने निवडणूक जिंकता येत नाही. निवडणुकीच्या काळात कुठलीही अमिष दाखविण्यापेक्षा माणसांच्या मनात विश्वास आणि प्रेम निर्माण करा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने दहावी आणि बारावीतील गुणवत्ता विद्यार्थ्याच्या सत्कार कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
हेही वाचा >>> बुलढाणा: मुसळधार पावसाचा तडाखा, अतिउच्चदाब वाहिनीचा मनोरा जमिनदोस्त; ४८ गावांचा वीज पुरवठा खंडित, तेरा हजार ग्राहकांना फटका
शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी म्हणाले. माणसांच्या गुणवत्तेचा संबंध त्यांच्या जाती किंवा कुठल्याही पंथाशी नाही तर त्याच्या गुणवत्तेशी असतो. त्यामुळे निवडणूक आली की हा माझ्या धर्माचा किंवा जातीचा असा विचार करण्यापेक्षा लोकांचे प्रेम आणि विश्वास निर्माण केले पाहिजे. कुठल्याही समाजाचा नेता हा त्या समाजाचा संपूर्ण विकास करत नाही. निवडणुकीच्या काळात मोठे प्रचारासाठी मोठे फलक लावत असतो मात्र प्रचाराचे फलक लावत किंवा सावजी मटनच्या पाटर्या देऊन कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही. आता लोक शहाणे झाले आहे. पार्टी करुन घेतात आणि मत दुसऱ्यांना देतात. त्यामुळे लोकांचा विश्वास व प्रेम निर्माण कराहे. आम्ही सर्व एक परिवार असून सर्व मिळून समाजाचे हित कशात आहे यावर काम करण्याची गरज आहे. मानवतेच्या आधारावर शिक्षकांनी काम केले पाहिजे असे आवाहन गडकरी यांनी केले.