केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेछा देण्यासाठी वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी नऊ नंतर शुभेच्छा देण्यासाठी भाजपा व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली होती. घराच्या बाहेर कार्यकर्त्याची गर्दी होती.
नक्की वाचा >> Birthday Special: नितीन गडकरींना YouTube कडून महिन्याला किती पैसे मिळतात?; स्वत:च म्हणाले होते, “आज मला महिन्याला…”
काहींनी अगदी सहा उंचीचा बुके भेट दिला तर काहींनी फेटा बांधून त्यांचा सत्कार केला. अगदी सर्वसामान्यांपासून ते काँगेस. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही गडकरींनी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. या निमित्ताने शहरातही भाजपाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे.
माझे सगळे मित्र आणि अभिष्टचिंतक यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. देशासाठी सेवा करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आहे, विदर्भात शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक काम करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहील. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी सतत प्रयत्नरत राहील, अशा भावना गडकरींनी व्यक्त केल्या.
भारताच्या स्वातंत्र मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल उद्या अमृत सरोवर कार्यक्रमा अंतर्गत पंजाबराव कृषी विद्यापीठ परिसरात उद्या २० अमृत सरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहेत. एनएचआय मार्फत यंदा यांच्यातर्फे ७५००० अमृतसरवर करण्याच्या प्रयत्न करणार आहे असाही संकल्प गडकरींनी बोलून दाखवला आहे.