Nitin Gadkari On Politicians And Their Expectations : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र असल्याचे म्हटले आहे. नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकजण दु:खी आहे. प्रत्येकाला ते सध्या ज्या पदावर आहेत, त्यापेक्षा मोठे पद हवे आहे.

असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र

या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र आहे, जिथे प्रत्येकजण दु:खी आहे. नगरसेवक आमदारकीची संधी न मिळाल्याने दु:खी असतो. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार नाराज असतो. एखादा मंत्री मुख्यमंत्री होऊ शकला नाही म्हणून दुखी असतो तर, मुख्यमंत्र्याला हायकमांड कधीही पद सोडण्याला सांगेल याची भीती असते.”

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
nitin gadkari on constitution
संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Nitin Gadkari question is why caste is considered in elections
निवडणुकीतच जातीचा विचार का; नितीन गडकरी यांचा प्रश्न
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

या कार्यक्रमात पुढे बोलताना गडकरी म्हणाले, “जीवनात अनेक आव्हाने असतात. या आव्हानांचा सामना करत पुढे जाणे हीच जीवन जगण्याची कला आहे.” या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक गोष्ट सांगितली. निक्सन यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, “माणूस पराभूत होतो तेव्हा संपत नाही, तो जेव्हा थांबतो तेव्हा संपतो.”

हे ही वाचा : “त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे होते…”, श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून नरेश म्हस्केंचा अदित्य ठाकरेंना टोला

राज्यात मुख्यमंत्रीपदावरून पेच

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे. यामध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तर शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) अनुक्रमे ५७ आणि ४१ जागा जिंकल्या आहेत. अशात आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा यावरून पेच निर्माण झाला आहे. एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणीही मुख्यमंत्री झाले तरी हरकत नाही असे म्हटले आहे. तर राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मागत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

भाजपाच्या विधीमंडळ नेत्याची निवड

दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा म्हणून आक्रमक झाले आहेत. कारण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला पाच वर्षे मुख्यमंत्रीपदापासून दूर रहावे लागले आहे. अशात आता राज्यातील भाजपा आमदारांची बैठक बोलावली असून, त्यामध्ये भाजपाच्या विधीमंडळ नेत्याची निवड होणार आहे.