नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने १३ दिवसांमंध्ये महाराष्ट्रभरात फिरून महायुतीसाठी प्रचार सभा घतल्या. शेवटच्या दिवशी १८ नोव्हेंबरला त्यांच्या चार सभा आहेत. त्यामिळून त्यांच्या एकूण जाहीरसभा तसेच रोड शोजची संख्या ७२ होईल.

गेल्या दोन आठवड्यांपासून गडकरी निवडणूक प्रचार दौरे करीत आहेत. दररोज सरासरी सात सभांना संबोधित करतात. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र गडकरी यांनी पालथा घातला.

Appointments of private secretaries to ministers only after approval of the Chief Minister Mumbai news
मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्त्या; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससाठीही निर्देश बंधनकारक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Hassan Mushrif takes charge of the ministerial post for the seventh time
मंत्र्यांची ओळख : हसन मुश्रीफ
minister profile Chandrashekhar Bawankule Indranil Naik Adv Ashish Jaiswal
मंत्र्यांची ओळख : चंद्रशेखर बावनकुळे, इंद्रनील नाईक, ॲड. आशिष जयस्वाल
ministers profile Radhakrishna Vikhe-Patil Prakash Abitkar Chandrakant Patil Madhuri Misal Datta Bharane
मंत्र्यांची ओळख : राधाकृष्ण विखे- पाटील, प्रकाश आबिटकर, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, दत्ता भरणे
List of Ministers in Maharashtra 2024 Shivsena Party
फडणवीसांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेचे किती मंत्री? वाचा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion NCP Ajit Pawar
Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीला किती मंत्रि‍पदे मिळाली? कोणत्या १० नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली? वाचा यादी!
Transfer of officers outside Mumbai in the wake of assembly elections
बदली अधिकाऱ्यांच्या परतीच्या मार्गात अडसर; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईबाहेर बदली

हेही वाचा…चंद्रपुरात कॉंग्रेस उमेदवाराची स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून कोंडी? जिल्ह्यातील इतर जागांवर परिणाम होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी गडकरी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यानुसार ४ नोव्हेंबरला नागपूरमधून त्यांच्या सभांना सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दक्षिण, पूर्व आणि मध्य नागपुरात त्यांच्या सभा झाल्या. त्यानंतर ७ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी नॉन स्टॉप जाहीरसभा घेतल्या. गडचिरोली ते मुंबई अख्खा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला. ९ नोव्हेंबरला तर कारंजा-घाडगे, पुलगाव, समुद्रपूर, वर्धा, हिंगणघाट आणि हिंगणा (बुटीबोरी) अशा सहा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी त्यांनी सभा घेतल्या. १५ नोव्हेंबरला एकाच दिवशी आठ मतदारसंघांमध्ये सभा घतल्या.या दिवशी आष्टी, कुरखेडा, नागभीड, उमरेड, कामठी, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर व पूर्व नागपूर अशा आठ मतदारसंघांमध्ये त्यांच्या सभा झाल्या.

हेही वाचा…शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही

समारोपाला चार सभा

१८ नोव्हेंबरला (सोमवार) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबणार आहे. अखेरच्या दिवशी गडकरी यांच्या चार सभा होणार आहेत. यातील दोन सभा गोंदियातील सडक अर्जुनी व तिरोडा येथे तर प्रत्येकी एक सभा आणि कामठीत एक व मध्य नागपुरातील गोळीबार चौकात आहे.

Story img Loader