नागपूर : शहरातील नाले स्वच्छ केल्याचे सांगितले जाते. मात्र मला कुठेच नाले साफ दिसत नाही. पुढे ज्या दिवशी पाऊस येईल त्या दिवशी नागपुरात फिरून ज्या भागात पाणी साचलेले दिसेल त्या भागातील नागरिकांना आंदोलन करण्यास सांगणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात शहरातील नाले साफ ठेवा, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला.

विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमात गडकरी बोलत होते. पाउस झाला की विविध भागांत पाणी साचते. गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणी साचण्याच्या ठिकाणाची संख्या दुप्पट झाली आहे. आता पाऊस आला की मी सगळीकडे फिरणार आहे. जिथे मला पाणी साचलेले दिसेल तेथे लोकांना आंदोलन करायला सांगेल. आपल्याकडे अजूनही ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली नाही. नाले सफाई होत नाही. अजूनही मुसळधार पाऊस आला की मोठ्या प्रमाणात शहरातील विविध भागांत पाणी साचत असल्यामुळे आयुक्तांनी नाले सफाईकडे लक्ष दिले पाहिजे, अन्यथा मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा गडकरी यांनी दिला.

हेही वाचा – वाघाच्या शिकारीसाठी ‘वन्यजीव गुन्हे नियंत्रण’ विभागातील माहितीचा वापर? सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध!

हेही वाचा – चंद्रपूर : प्रशासकीय भवनाच्या इमारतीला आग, मनपा व औष्णिक विद्युत केंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील अकरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी दिला आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या कामावर लक्ष ठेवा. जो काम चांगल्या दर्जाचे करणार नाही त्याला काळ्या यादीत टाका, असे स्पष्ट आदेश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.