नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कोणतेही काम धडाक्यात करतात. विश्रांती हा शब्दच त्यांच्या शब्दकोषात नाही. अतिदगदग त्यांच्या प्रकृतीला सहन होत नाही तरी ते थांबायला तयार नाहीत. निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यात २४ एप्रिलला महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत त्यांना भोवळ आली. खाली पडले. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी काही दिवस आराम केला आणि पुन्हा प्रचारासाठी बाहेर पडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक दिवशी दोन ते तीन मतदारसंघात ते प्रचारासाठी जातात. ३ जूनला सकाळी गडकरी यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे जी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. त्यानंतर हातकणंगले व माढा मतदारसंघात त्यांच्या प्रचार सभा आहे. २ मे रोजी ते आंध्रप्रदेशात प्रचारासाठी गेले होते. तेथे दोन लोकसभा मतदारसंघात सभा झाल्या.

हेही वाचा…गडचिरोली : खळबळजनक! जादूटोण्याच्या संशयातून महिलेसह दोघांना जिवंत जाळले…

सध्या महाराष्ट्रात उन्हं प्रचंड आहे. याची तमा न बाळगता गडकरी त्यांच्या स्टाईल नुसारच कामाला सुरुवात करतात. नागपूरमध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान झाले. त्याकाळातही सकाळी आणि संध्याकाळपासून रात्रीपर्यंत गडकरी नागपुरात प्रचारासाठी फिरत होते. वेळ मिळेल तेव्हा ते पूर्व विदर्भात इतर मतदारसंघात प्रचारासाठी जात असे. नागपूर मधील मतदान झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रात इतर ठिकाणी प्रचारासाठी जाणे सुरू केले. या अतिदगदगीतूनच त्यांची प्रकृती बिघडली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari defies health concerns continues campaigning with vigor despite heat cwb 76 psg