नागपूर : समाजकारण हेच ध्येय समोर ठेऊन आजपर्यंत वाटचाल केली. आतापर्यंत समाजकार्याला महत्त्व दिल्यानेच आज वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व येथे आलात. शुभेच्छुकांची गर्दी हे त्याचेच द्योतक आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
गडकरी यांचा आज ६६ वा वाढदिवस. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींना शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवांस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गर्दी केली. यावेळी गडकरी यांच्या हस्ते दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी देण्यात आल्या.
हेही वाचा – श्री गणेशा ! शासनमान्य ‘स्वस्त वाळूचे दुकान’ सुरू; पहिले लाभार्थी कोण?, वाचा…
आशीष देशमुखांची उपस्थिती
काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आशीष देशमुख यांनीही गडकरींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. गडकरी हे मला पितृतुल्य आहे. माझ्या राजकीय प्रवासात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जेव्हाजेव्हा मला आशीर्वादाची गरज असते तेव्हातेव्हा मी गडकरी यांच्याकडे येत असतो, असे देशमुख म्हणाले.