नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या ‘रिकार्पेटिंग’ला विलंब होत असल्याने संताप व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी एमएडीसीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांच्याकडून काढून घेतली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे नागपूर विमानतळाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एमएडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून स्वाती पांडे कार्यरत आहेत. एमएडीसी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त उपक्रम मिहान इंडिया लि. (एमआयएल) ही कंपनी नागपूर विमानतळाचे व्यवस्थापन पाहते. सध्या एमआयएलचे अध्यक्ष स्वाती पांडे आहेत. परंतु विमानतळावरील धावपट्टीचे ‘रिकार्पेटिंग’ अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे येथील उड्डाणाच्या वेळांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी काही विशिष्ट वेळातील विमानांचे तिकीट महागले आहे. त्यावरून नितीन गडकरी यांनी एमआयएल आणि एएआय अधिकाऱ्यांना तसेच हे काम करीत असलेल्या कंत्राटदारवर नाराजी व्यक्त केली. गेल्या सोमवारी गडकरी यांनी नागपूर विमानतळाला भेट दिली आणि संथ गतीने होत असलेल्या कामाबाबत संताप व्यक्त केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाती पांडे कडून एमआयएलचे अध्यक्षपद काढून जिल्हाधिकारी डॉ. इटनकरकडे दिले आहे. शिवाय या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये केंद्रीय मंत्री निती गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आहेत.

हेही वाचा >>>चार दुर्मिळ चांदी अस्वलांचा मृत्यू, जंगलाला लागून असलेल्या मार्गावरील वाहतूक ठरतेय कर्दनकाळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ‘रिकार्पेटिंग’ अनेक दिवसांपासून रखडले आहे. परिणामी, विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. प्रवाशांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. २०२४ मे महिन्यात के जी गुप्ता कंपनीला रनवे रिकार्पेटिंगचं काम दिलं. रनवे रिकार्पेटिंगच्या कामामुळे विमान कंपन्यांनी शेड्युल बदलले, त्यामुळे विमान तिकिटांचेच दर वाढले .

त्यामुळे लवकरात लवकर धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश गडकरी यांनी पाहणीनंतर अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत याबाबत चर्चा केली होती.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत दिलीप जाधव, चंदन गोस्वामी, प्रकाश भोयर, गिरीधारी मंत्री, संजय पेशने आणि उदय आंबुलकर यांचा समावेश आहे. ही समिती लवकरच आढावा बैठक आयोजित करणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी इटनकर यांच्याकडे एमआयएलचे अध्यक्ष म्हणून नागपूर विमानतळाची जबाबदारी आली आहे. ते आता विमानतळाच्या दैनंदिन व्यवहार विशेषत: धावपट्टीचे ‘रिकार्पेटिंग’च्या कामावर लक्ष ठेवणार आहेत.