मुंबईला अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी अमिताभ आणि जया बच्चन यांनी माझ्या फिटनेसबद्दल कौतुक केले. ‘तुम्ही आहे त्या वयापेक्षा दहा ते पंधरा वर्षे तरुण दिसता’ असे त्यांनी सांगितल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
हेही वाचा >>> गडचिरोलीमधील देसाईगंजमध्ये रानटी हत्तींची मनसोक्त जलक्रीडा
भारत रक्षा मंचच्या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात गडकरी यांनी वरील किस्सा सांगितला. नियमित प्राणायाम आणि योगा यामुळे आरोग्यात सुधारणा झाली. काही वर्षांपूर्वी प्रकृतीच्या तक्रारी होत्या. आता मी दररोज एक तास प्राणायाम करतो. त्याशिवाय मी इतर कामांना सुरुवातच करीत नाही. मला डॉक्टरांनी प्राणायामाचे धडे दिले. योगासनामुळे आपण तंदुरुस्त राहतो हे लक्षात घेतले पाहिजे. आज अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. ते योग शिकण्यासाठी लाखो रुपये वेतन द्यायला तयार आहेत. आपण आपले ज्ञान चांगल्या तऱ्हेने सादरीकरण करायला शिकलो पाहिजे असेही गडकरी म्हणाले