नागपूर : तरोडी (बु) येथे बांधलेल्या पंतप्रधान निवास योजनेत समस्यांचा डोंगर उभा झाला असून येथील रहिवासी घर सोडून जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने नुकतेच प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना चांगेलच धारेवर धरले व या ठिकाणी तात्काळ सुविधा पुरवण्याचे आदेश दिले.
गडकरी यांनी शुक्रवारी यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तरोडी (बु) येथे उभारण्यात आलेल्या निवासी संकुलातील घरांना पाणी, वीज, रस्ते यासारख्या सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. त्या ठिकाणी बोअरवेलची व्यवस्था करा, तेथे राहत असलेल्या नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून जाणून घ्या, प्रत्येक कामाची पाहणी करा, असेही निर्देश गडकरी यांनी दिले.
हेही वाचा – राज्यात पाऊस नाही, तर उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज काय, जाणून घ्या..
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार टेकचंद सावरकर, नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
सुरेश भट सभागृहाचा आढावा
रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहातील देखभाल दुरुस्तीच्या संदर्भात गडकरी यांनी आढावा घेतला. सभागृहात प्रेक्षक व कलावंतांच्या विरंगुळ्यासाठी आणखी काही उपक्रम राबवता येतील का, यावरही चर्चा झाली. सभागृहातील ध्वनी व्यवस्था, आसनव्यवस्था, रंगमंचावरील प्रकाशव्यवस्था, वाहनतळ आदींची माहिती गडकरींनी घेतली.