नागपूर : मी करीत असलेल्या कामाने प्रभावित होऊन यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने मला मतदान करतील, पण त्यांनी मतदान केले नाही तरी मी अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी काम करीतच राहील, असे प्रतिपादन भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिम येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.
गडकरींच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात चारपदरी महामार्गाचे लोकार्पण शुक्रवारी पार पडले. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणले, मी कधीही जात आणि समाजाच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करीत नाही. गरीब जो कुठल्याही धर्माचा असो तो गरीबच असतो. सरकारही लोकांमध्ये भेदभाव करीत नाही, स्वंयपाकाचा गॅस खरेदी करायचा असेल तर तो हिंदू असो वा मुस्लिम यांना सारख्याच किंमतीत खरेदी करावा लागतो.
हेही वाचा – गृहमंत्रांच्या जिल्ह्यात दोन दिवसांत तीन खून; कायदा व सुव्यवस्था…
कोवीड काळात नागपूरमधील ताजबागमध्ये अनेक लोकांच्या बैठकी घेतल्या. त्यात मी स्पष्टपणे तेथील लोकांना सांगितले की, मी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा माणूस आहे, मी तुमची सेवा करीत राहील, तुम्ही मला मते द्या किंवा देऊ नका, माझे काम मी करीतच राहील, असे गडकरी म्हणाले