नागपूर : गेल्या काही वर्षांत देणे हा नेत्यांचा व्यवसाय झाला असून राजकीय नेत्यांच्या चिठ्ठ्यांवर जर कर्ज दिले तर बँक डुबीत जाईल. कामठी येथे अरविंद को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका व्यक्तीने तर मला चक्क अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नावाने चिठ्ठी द्या, अशी मागणी करत गमतीदार किस्साच सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – रक्षाबंधन : जाणून घेऊया इतिहास, शास्त्र आणि महत्त्व

हेही वाचा – सप्टेंबर महिन्यात बँका तब्बल आठ दिवस बंद

राजकीय पक्षाचे नेते वेगवेगळ्या कारणासाठी चिठ्ठ्या वाटण्याचे काम करतात. काल माझ्याजवळ एकजण आला आणि म्हणाला, व्हिसा मिळत नसल्याने अमेरिकेच्या अध्यक्षांना चिठ्ठी द्या अशी मागणी त्याने केली. आम्ही चिठ्ठ्या देण्याचा धंदा करतो, मात्र त्याचे परिणाम काय होतात हे त्यांना माहीत नाही. नेत्यांच्या चिठ्ठीवर कर्ज द्यायचे नाही. तो काँग्रेसचा असो की भाजपाचा. नेत्यांच्या चिठ्ठीवर कर्ज दिले जाणार नाही तरच बँकेची प्रगती होत राहील. पण नेत्यांच्या चिठ्ठीचा आदर करत राहिले तर दहापैकी आठ कर्ज हे डुबीत खात्यात जाईल आणि बँक डुबीत जाईल, असेही गडकरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari made a statement on bank loans in nagpur he said if you give a loan on the note of the leaders consider the bank to have sunk vmb 67 ssb
Show comments