भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या भन्नाट कल्पनेसाठी प्रसिद्ध आहेत. सांडपाणी विकून पैसे मिळू शकतात, हे त्यांनी नागपूर महापालिकेच्या माध्यमातून दाखवून दिले. आता त्यांनी कच-या पासून संपत्ती निर्मितीची कल्पना मांडली. तनसापासून डांबर तयार करण्याची घोषणा त्यांनी केली. संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त रेशीमबाग चौकातील जैन कलार समाज सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी संकल्पना मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- आगामी निवडणुकांसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोर्चेबांधणी सुरू

गडकरी म्हणाले, गाडगेबाबा यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबविले. परंतु आता काळ बदलला आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती शक्य आहे. विदर्भातील धान पट्ट्यात मोठ्या प्रमाणात तनस तयार होते. ते टाकाऊ असल्याने जाळले जाते. पण त्यात असलेल्या घटकापासून डांबर तयार करता येते. भारत डांबर आयात करते. देशात तनसापासून डांबर तयार केले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
अहमदाबाद शहरातील कच-याचा वापर रस्ते बांधणीसाठी केला जात आहे, असे गडकरी म्हणाले.