नागपूर : केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी पताका फडकावली. मात्र, उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात गडकरींचा जनाधार सातत्याने घटत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत येथे गडकरींना विकास ठाकरे यांच्या तुलनेत ३२ हजारांपेक्षा कमी मते मिळाली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेले गडकरी यांनी सर्वप्रथम २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यांना पहिल्याच प्रयत्नात खासदारकी मिळाली. त्यानंतर २०१९ आणि २०२४ सलग विजय मिळवून त्यांनी ‘हॅट् ट्रिक’ साधली. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी नागपूर मतदारसंघातून अशी किमया केली होती. परंतु, मुत्तेमवार यांना पराभूत करून पहिल्यांदा संसदेत पोहोचलेल्या गडकरी यांना उत्तर नागपुरातील मतदारांच्या नापसंतीच्या सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत त्यांना या मतदारसंघात ९० हजार १९१ मते मिळाली तर काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी तब्बल एक लाख २२ हजार ४०६ मते घेतली. भाजप येथे काँग्रेसपेक्षा ३२ हजार २१५ मतांनी मागे राहिला. बसपने केवळ ६ हजार ६९२ मते मिळवली.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा…एसटी बसच्या प्रवासात सुट्टे पैसे नाही, या प्रणालीतून तिकीट काढणे शक्य

काँग्रेसच्या मताधिक्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलाचा मुद्द्यावर जोर दिला होता. तसेच बेरोजगारी, महागाई आणि निवडक उद्योगपतींना मोदी सरकार देशाची संपत्ती देत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे कधीनव्हे एवढे बौद्ध, दलित, मुस्लीम तसेच धर्मनिरपेक्ष मतदार काँग्रेसच्या बाजूला वळण्याचे दिसून येते. त्याचाच परिणाम म्हणजे बसपचे उमेदवाराला आजवरचे सर्वांधिक मतांवर समाधान मानावे लागले. बसपचे मतदारन बौद्ध, दलित, मुस्लीममध्ये सर्वांधिक आहे. मात्र, यावेळी या सर्व मतदारांनी भाजपच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूने मतमदान केल्याचे दिसून येते.

हेही वाचा…बुलढाणा जिल्ह्यात ‘ट्रॅव्हल्स’ उलटली; १७ प्रवासी जखमी

२०१९ च्या निवडणुकीत गडकरी यांनी येथे ८७ हजार ७८१ मते तर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी ९६ हजार ६९१ मते घेतली होती. या निवडणुकीत बसपने ९ हजार ९५१ आणि वंचित बहुजन आघाडीला ६ हजार ५७३ मिळाली होती. काँग्रेसने भाजपपेक्षा ८ हजार ९१० मते अधिक घेतली होती. २०१४ च्या निवडणुकीत गडकरी यांना येथे ७४ हजार ७४६ मते तर काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी ५६ हजार २०६ मते घेतली होती. भाजपला येथे १८ हजार ५४० एवढे मत्ताधिक्य होते. या निवडणुकीत बसपला ३३ हजार ६६३ आणि आपने ११ हजार २१८ मते घेतली.