नागपूर : जगात कुठेही फुकट वस्तू मिळत असल्यास ती घेण्यासाठीच्या रांगेत भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक दिसते, असे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.नागपूर विमातळ जवळील ग्रॅन्ड एअरपोर्ट बॅनक्युट येथे शनिवारी झालेल्या पर्ययन पाॅलिसी २०२४ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्यासह या विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ॲडव्हांटेज विदर्भ कानक्लेव्हचे पदाधिकारी उपस्थित होते. बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले गडकरी पुढे म्हणाले, एकदा पत्नीसह एका कामानिमित्त स्विझर्लन्डला गेलो होतो. येथे एका मोठ्या चाॅकलेट कंपनीत नि:शुल्क चाॅकलेट वाटले जात होते. हास्य विनोद करतांना पत्नीला म्हटले येथे रांगेत आपल्याला सर्वाधिक भारतीय मिळतील. त्यावर पत्नीने तुम्ही काहीही बोलता असे म्हटले.

प्रत्यक्षात जवळ गेल्यावर येथे रांगेत भारतीयच सर्वाधिक होते. दुसऱ्या उदाहरणात त्यांनी येथे फुकट पेय मिळणाऱ्या रांगेत पत्नीला भारतीयच जास्त दिसतील असे विनोदाने सांगितले. प्रत्यक्षात तसेच झाले. त्यामुळे आपल्याला फुकट वस्तूंचे आकर्षण जास्त आहे. त्यामुळेच आजही आपल्याकडील हाॅटेल, रेस्ट्राॅरेन्ट उद्योजकांनाही व्यवसाय सुरू केल्यावर मोठ्या व्यक्तीकडून कार्यकर्त्याच्या नावाने चिठ्ठी देऊन नि:शुल्क सेवेचा आग्रह होतो.पोलीस, आरटीओसह इतर खात्यातील मोठ्या अधिकाऱ्यांकडून येथे घेतल्या जाणाऱ्या सेवेच्या बदल्यात मोबदला देण्याबाबतही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यानंतरही हा व्यवसाय योग्यरित्या चालवल्यास तो विकसीत होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार देऊ शकतो. त्यामुळे पर्यटन धोरणाच्या जोरावर येथील हाॅटेलचा विकास, देश- विदेशातील पर्यटकांना आकर्षीत करणे, नैसर्गीक सौंदर्याच्या जोरावर नवनवीन कल्पना सुरू करून मोठा व्यवसाय शक्य असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari campaign Miraj, Suresh Khade,
काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित, नितीन गडकरी यांचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
nitin gadakari in Ichalkaranji
इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी
Cook on Chief Minister Varsha bungalow Arvi constituency
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका

हेही वाचा >>>मतांसाठी लाडक्या बहिणीला १५०० रुपये आणि लाडक्या मंत्र्याला ५०० कोटींचा भूखंड; संजय राठोड भूखंड प्रकरण

विदर्भात जंगल, खाणींचा फायदा

राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे. सोबत येथील जंगलात वाघांसह इतरही वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. दुसरीकडे येथे कोळसासह इतरही धातूंच्या खाणींची संख्याही मोठी आहे. त्यामुळे खाणींच्या आत व बाहेर कशा पद्धतीने काम चालतेसह इतरही आकर्षण अनेकांच्या मनात असते. या दोन्ही कामाचे संधीत रुपांतर करून विदर्भात पर्यटकांची संख्या वाढवून अनेक रोजगार तयार करणे शक्य आहे. त्यासाठी सरकारने स्थानिक व्यवसायिकांसह या क्षेत्राशी संबंधित नागरिकांचीही मदत घेणे लाभदायक असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ

प्रकल्पात अडथळा आणणाऱ्यांना ठोकणार..

महामार्ग, पर्यटनासह इतर कोणतेही चांगले प्रकल्प असल्यास त्यात अडथळा आणण्याचे काम काही शुक्राचार्य करत असतात. या बिनकामाच्या लोकांना घरी बसवण्याची गरज आहे. यंदा सुमारे ७५ या पद्धतीच्या अधिकाऱ्यांना घरी पाठवणार आहे, असे सांगत नितीन गडकरी यांनी विविध अडचणीच्या नावावर प्रकल्प रोखणाऱ्या अधिकाऱ्यांना तंबी दिली. सोबत विदर्भातील तलाव, डॅम्पसह इतरही निसर्गाने नटलेल्या भागात हाॅटेलसह इतर क्रीडाशी संबंधित सोय करून पर्यटक वाढणे शक्य असल्याचेही गडकरी म्हणाले.