लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य नेहमीच चर्चेत असते. ते स्पष्ट वक्ते म्हणून ओखळले जातात. त्यांचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी एका दीक्षांत समारंभात ‘’जो करेगा जात की बात, उसको मारुंगा कसके लाथ’ असे वक्तव्य केले आहे.

सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशनचा दीक्षांत समारंभ वनामती सभागृहात शनिवारी झाला. याप्रसंगी पदवीधारकांना मार्गदर्शन करताना गुणवत्ता श्रेष्ठ आहे. जात, धर्म दुय्यम असल्याचे गडकरी म्हणाले. कोणतीही व्यक्ती तिच्या गुणवत्तेने मोठी होते. मी जात, धर्म, पंथ, लिंग यावरून भेदभाव करत नाही. पण, काही जातीवाले लोक मला भेटायला येतात. मी त्यांना ५० हजार लोकांसमोर सांगितले की, “जो करेगा जात की बात ,उसको मारुंगा कसके लाथ”. असे विधान केल्यानंतर माझ्य काही मित्र म्हणाले, असे सार्वजनिक ठिकाणी बोलून मोठे नुकसान केले आहे. त्यावर मी म्हणालो, “जो होगा सो होगा. निवडणूक जिंकली नाही आणि मंत्रीपद मिळाले नाहीतर मनुष्य मरत नाही. आपल्या विचारावर ठाम राहिले पाहिजे आणि त्याचे आचारणात आणले पाहिजे,” असेही गडकरी म्हणाले.

नोकरी देणारे व्हा- गडकरी

पदवी मिळवणे म्हणजे ज्ञान प्राप्त करणे आहे. या ज्ञानाला उद्यमशिलतीची जोड मिळाली पाहिजे. यामुळे उद्योग उभे राहतात. त्यातून रोजगाराची निर्मिती होते. शिवाय उद्योग उभारणाऱ्याला लाभ देखील होता. अशाप्रकारे ज्ञानातून संपत्ती निर्माण होते आणि राष्ट्राचा विकास होतो. त्यामुळे पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात न राहता उद्यमशील बनण्याचा प्रयत्न करा. नोकरी मागणारे नाहीतर नोकरी देणारे बना, असा सल्लाही गडकरी यांनी पदवीधारकांना दिला.

शेतकरी आत्महत्या

विदर्भात १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे अभ्यास सुरू आहेत. त्यासाठी मला वेगवगेळ्या विद्यापीठाने १२ डी.लिट. दिले आहेत. शेतकरी आत्महत्या कमी करणे आणि थांबवणे हे आपले अंतिम उद्देश्य आहेत. पदविधारकांनी आपल्या देशाच्या झपाट्याने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेचा भाग बनवण्यासाठी प्रयत्नशिल असले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. शिवाय मक्यापासून तयार केलेल्या बॉयो इथेनॉलवर चालणारी कार बनवण्यात आली आहे. ती कार जेव्हा धावते तेव्हा ६० टक्के वीज निर्मिती करते, असेही त्यांनी सांगितले.